होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सावधान! घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट; जळगावात ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस

On: August 6, 2026 12:35 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगावमध्ये आज आणि उद्या दोन दिवस हलका पावसाचा अंदाज आहे. सध्या मुसळधार पावसाची शक्यता नसून हवामान विभागाने ८ ते १० ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या ठिकाणी विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी सोसाट्याचा वाऱ्यासह (ताशी ३०-४० किमी) वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ऑगस्टचा पहिला हप्ता आता संपल्यात जमा आहे. आता जळगावचा पिण्याच्या पाण्याची चिंता नसली तरी आगामी काळात पाण्याची गरज भासणार आहे. दरम्यान आज पुणे-सातारा घाट परिसर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट आहे.

उत्तर महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट

दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार अहिल्यानगर या उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यात ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलका पाऊस होणार आहे. जळगावमध्ये आज आणि उद्या असे दोन दिवस ग्रीन अलर्ट आहे. त्यांनतर ८ ते १० ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक घाटमाथा परिसरला आज येलो अलर्ट आहे. तूर्तास जळगाववात आणखी दोन दिवस आणि उत्तर महारष्ट्रातील पुढील ४ दिवस हलक्या सरींचा पाऊस आहे.

पुणे-सातारा घाट परिसराला ऑरेंज अलर्ट

राज्यात अनेक ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे. या ठिकाणी पाऊस नसला तरी घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामध्ये पुणे, सातारा घाटमाथा परिसराचा समावेश आहे. तसेच रायगडाला देखील आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र नाशिक कोल्हापूर घाटमाथा परिसराला येलो अलर्ट आहे. येथे मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

राज्यात उद्या या परिसरात मुसळधार

७ ऑगस्ट रोजी उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. येथे नाशिक, पुणे, सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. ७ ऑगस्ट रोजी रायगड, पुणे सातारा घाट परिसर, हिंगोली, नांदेड, या पाच ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ३४ जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्ट असून हलका किंवा मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment