होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणाराच उपेक्षित! भुसावळच्या स्मशानभूमीचे केअर टेकर्स अरुण रंधे यांची खंत

On: August 7, 2026 3:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusaval News: समाजातील प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होऊन मृत व्यक्तीवर अंतीम संस्कार करण्याची जबाबदारी पार पाडली. मात्र, भुसावळ शहरातील तापी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये बिन पगारी काम करणारे अरूण रंधे यांच्या तरुण मुलाचे अकस्मात निधन झाले. परंतु त्यांच्या दुःखात शहरातील लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे पुढाऱ्यांनी साधी भेट न देता साधी संवेदनाही व्यक्त केली नसल्याची खंत स्मशानभूमीचे देखरेख करणारे अरुण रंधे यांनी व्यक्त केली.

स्मशान भूमी म्हटलं की, त्या ठिकाणी जाण्यासाठी भल्याभल्यांचा जीव घाबरतो, परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचे काम करणारा अरुण रंधे यांनी एका नगरसेवकाच्या शब्दाचा मान राखत हमाले काम सोडून आपल्या मुलाबाळासह स्मशानभूमी येथे राहून बिन पगारी काम करून लागला.

कायमस्वरूपी कामावर ठेवतील या आशेवर..

परंतु नगरपालिका अरुण रंधे यांना अश्वासना पलीकडे काहीच न देता त्यांच्याकडे कानाडोळा करीत आहेत. सांगायचे तात्पर्य असे की ज्या वेळेस कोरोना सारख्या महामारीने जगात हाहाकार माजविला होता, त्यावेळी कित्येकांनी आपले आजोबा,आजी,आई,वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी यांच्यासह आपल्या आप्त्येष्टांना गमावे लागले.

परंतु त्यावेळी नागरिकांनी कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या मृत नातेवाईकांना अग्निदहन संस्कार तर सोडा, त्यांची राख सावटण्यासाठी देखील स्मशानभूमीत आले नाही, ही किती मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. ज्यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश तायडे त्यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी गेले असता, त्यावेळी रंधे म्हणाले की, कोरोना सारख्या महामारीने सगळीकडे हाहाकार माजला असतांना नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण होते. अश्या परिस्थितीत मी आपली आणि माझ्या परिवारांचा विचार न करता प्रत्येक मृत व्यतीच्या देहावर त्यांच्या धर्म परंपरेनुसार त्यांची विधीवत पूजा करून आपली माणुसकी जपत त्यांचा अंत्यविधी पार पाडला.

मग त्यावेळी नागरिकांना कोरोनाची भिती होती. मग ही महामारी मला आणि माझ्या परिवाराला लागू नव्हती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या मुलाने त्या परिस्थित माझ्या खांद्याला खांदा लावून मला साथ दिली. तोच मुलगा अचानकपणे जग सोडून गेला. त्यावेळी माझ्यावर आणि माझ्या परिवारावर किती मोठा आघात झाला असेल. तेव्हा लोकप्रतिनिधी आणि सर्व समाजाचे ठेकेदार गेले कोठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर शहरातील एखादी व्यक्ती मृत पावली असेल किंवा लावारिश मृतदेहावर अंतीम संस्कार करावा लागेल किंवा कोणी नदीपात्रात बुडला असेल तर तेव्हा साऱ्यांना मी आठवतो.

मग माझ्या दुःखाच्या वेळी विविध पक्षाचे नगरसेवक,समाजाचे पुढारी गेले कुठे? मग बाकीचे सांत्वन तर सोडा ते भेट देऊ शकले नाही, याची खंत मला मनाला बोचते. मृतांची सेवा केल्याचा असा मोबदला मिळत असेल तर येथे काम करण्याचा उपयोग काय? असे बोलून रंधे यांनी आपली भावना व्यक्त करून आपल्या अश्रूना वाट मोकळी केली.

दरम्यान स्मशान भूमी हे मानव जातीच्या प्रवासाचे शेवटचे ठिकाण आहे. किसी शायरने बहुत खुब कहा, यहा अच्छे से अच्छा, और बडे से बडा. मंत्री से लेके संत्री तक, खासदार से लेके आमदार तक भूमाफिया से लेके ठेकेदार तक, अच्छे अधिकारी से लेके भ्रष्ट अधिकारी तक, बाबूजी से लेके चपराशीतक तक, पोलीस लेके चोर तक, डॉन से लेके लफंगो तक. यह व ठिकाणा है, यहा अच्छे अच्छो की राख हो जाती है! नगरपालिकेला एवढे सांगणे आहे की, मृत मुलाच्या बापाला नगरपालिकेचे दाखविलेले नोकरीचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल हीच त्यांच्या मुलाला नगरपालिकेकडून खरी श्रद्धांजली ठरेल. या सांत्वन भेटीप्रसंगी भारतीय संघाचे अध्यक्ष राजेश आव्हाड, माजी गट विकास अधिकारी रमेश तायडे, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सुरेश वानखेडे समाजसेवक विजय सावळे, भुसावळ तालुका बौद्ध महासंघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment