होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

केंद्राच्या शैक्षणिक धोरणाविरोधात विद्यार्थी मोर्चा अन् भारत मुक्ती मोर्चाचे धरणे आंदोलन

On: August 20, 2026 4:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: संविधानाने भारतीयांना शिक्षणाच्या मुलभूत अधिकार दिला आहे. परंतु केंद्रशासन व राज्यशासन या अधिकारांपासून दूर ठेवत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाने तर येथील गोरगरीब, वंचित,बहुजन घटकाला मिळणारे मोफत शिक्षणाचे ही तीनतेरा वाजवलेले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणा विरोधात भारतातील सर्व राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय विद्यार्थी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा या संघटनांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

सदर आंदोलन तीन चरणात होण्याचे आदेश भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिले आहेत. आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रद्युम्न वारडे व भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष देवानंद निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात बहुसंख्य विद्यार्थी,शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व पालक उपस्थित होते.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

* ईव्हीएमच्या माध्यमातुन होणा-या निवडणुका या पारदर्शक पध्दतीने व   विश्वसनीयतेच्या   निकषावर घेण्यासाठी त्यात सुधारणा करण्यात याव्यात.

* नीट पेपर फुटी प्रकरणात केवळ मंत्री महोदयांनी राजीनामा देऊन भागणार नाही:तर सदर   प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जावी.

* जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर केलेली जीवघेण्या मारहाणीची निपक्षपाती   चौकशी व्हायला     हवी.

* वारंवार होणारी पेपरफुटी तत्काळ थांबायला हवी.

* शिक्षण संस्थांचे खाजगीकरण थांबवून खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू     करायला हवे.

* राष्ट्रीय शिक्षण नितीत विद्यार्थी हित लक्षात घेऊन बदल करण्यात यावा.

* राष्ट्रीय परीक्षा समितीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

* २०११ पुर्वी नोकरीस लागलेल्या शिक्षकांची TET परीक्षा घेण्यात यावी.

* केंद्रशासन व राज्यशासन स्तरावर रिक्त पदांवर नवीन नोकर भरती   करण्यात यावी.

* देशात समान शिक्षण व्यवस्था लागु करण्यात यावी.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, सुनिल देहडे, खुशाल सोनवणे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राज्य प्रभारी प्रा.डॉ.प्रकाश कांबळे, विद्यार्थी समितीचे प्रा.डॉ.एस.एस.राणे, इंजि.डी.एन पाटील, प्रा.एन.व्ही.भारंबे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे आकाश लोंढे, सुमित भालेराव, मुकेश सावकारे, मयुर तायडे, मनोहर तायडे, मयुर तायडे, विश्वजित तायडे, देवराज भालेराव, सम्यक गायकवाड, स्वप्निल गजरे, रोहन तायडे, राकेश बारेला, संघरत्न बाविस्कर, शुभम अहिरे, दिलीप सपकाळे, विद्यार्थ्यांचे पालक प्रा.किसन हेरोळे,प्रा.श्रीकांत तायडे, प्रा.चंद्रशेखर अहिरराव, रविंद्र मोरे, कैलास मसाने, रमेश थाटे, त्र्यंबक सोनवणे, अशोक तिडके, सुनील सोनवणे, मनोहर कोचुरे, किशोर तायडे, तबन ह्याळिंगे, अशोक बाविस्कर, आर.बी.परदेशी, भीमराव नन्नवरे, मोरसिंग राठोड, महेंद्र साळवे, एड.आनंद कोचुरे, इंजि.दिलीप तासखेडकर, दिलीप इंगळे, डी.एम.भालेराव, प्रभाकर मोरे, देविदास पारधे, मल्हारी सरदार, डॉ.शाकीर शेख, लंकापती भालेराव, अकील कासार, रविंद्र बाविस्कर, किशोर चौधरी, विजय सुरवाडे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment