Jalgaon News: येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनच्या कार्याध्यक्षा तथा नगरसेविका डॉ.अमृता सोनवणे तसेच मू.जे.स्वायत्त महाविद्यालय क्रीडा संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय के.सी.ई.सोसायटीच्या समन्वयिका प्रा. स्वाती बऱ्हाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन होत्या. यावेळी कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रा.शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.गुणवंत वंजारी, जिमखाना समिती चेअरमन प्रा.वर्षा पाटील यांची उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रणजीत पाटील यांनी केले. डॉ.अमृता सोनवणे यांनी खेळाडू विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विशद करीत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा,असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले.
यावेळी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांना क.ब.चौ. उ.म.वि.च्या वतीने सर्वोत्कृष्ट क्रीडा संचालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल डॉ.अमृता सोनवणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी हिमानी पाटील, मुक्तेश सोनवणे, हर्षिता पाटील, धन्वी पाटील, सोनिक भावसार, मानसी बडगुजर, अंकित कोळी, पार्थ अहिरे, निधी कुंटे, प्राची विश्वुते, इशा देशपांडे, प्रिया लोटवाला, अनुष्का वाणी, वृत्ती सोंगटी, सानिका पाटील, सुयोग सरोदे, रोशनी राणा, आर्या बेहेडे, गुंजन बागडे, फरहान शेख, हितार्थ मोहीरे, साक्षी मराठे, श्यामल भावसार, दिव्या मोरे, इशा कुनिया, समीक्षा महादे, रोशनी पाटील, धनश्री पवार, गौरी पिंगळे, अद्विका सिंग, अर्चिया तडवी, दिव्या लिंगायत, रिया पाटील, दूर्वा पाटील, आर्या देशपांडे, रश्मी बिऱ्हाडे आणि रेवती जगताप आदींचा समावेश होता.
यावेळी खेळाडू, प्राध्यापक व उपस्थितांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिमखाना समितीच्या चेअरमन प्रा.वर्षा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिमखाना समिती सदस्य प्रा.दिनेश महाजन, प्रा.प्रमोद भोई, प्रा.संदीप वानखेडे, प्रा.संदीप गव्हाळे, प्रा.शिरीष नारखेडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.








