चोपडा : चोपडा नगरपालिका निवडणूक नुकतीच पार पडली. सोमवारी (दि. १९ जानेवारी २०२६) खातेवाटप करण्यात आले. दरम्यान, अवघ्या काही तासांनी शहराच्या विविध भागातून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांनी प्रत्यक्ष पाहणी करत काही समस्या तातडीने सोडविल्या. यामुळे ‘दबंग सेवक’ म्हणून बोरोले यांची शहरात चर्चा सुरु आहे.
रत्नदीप नगरातील नागरिकांनी पायाभूत सुविधांबाबत तक्रार केल्यानंतर उपनगराध्यक्ष बोरोले यांनी संबंधित ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. लागलीच संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्यास सांगितले.
नागरिकांनी व्यक्त केले समाधान
दरम्यान, बोरोले यांनी सांयकाळी रत्नदीप नगरातील रहिवाशांना फोन करून संबंधित कामाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी नागरिकांनी काम पूर्ण झाल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
यापूर्वीही अनेक प्रश्न मार्गी
बोरोले यांनी यापूर्वीही काही परिसरातील समस्यांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चर्चा करून तात्काळ प्रश्न मार्गी लावले, अशी माहिती नागरिकांनी दिली.








