होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

On: September 3, 2026 7:43 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: समृद्धी महामार्गासह राज्यातील पायाभूत सुविधांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मुंबईतही काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे विणले जात असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येईल याचं नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे एबीपी माझाच्या ‘माझा इन्फ्रा व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारा गेमचेंजर प्रकल्प ठरला आहे. ७०१ किमी लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेबाबत एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती दिली. समृद्धीसाठी जमीन हस्तांतरित झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या खात्यात दोन तासांत पैसे

समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात नाराजी आणि अविश्वासाचं वातावरण होतं. यापूर्वीचे अनुभव चांगले नसल्याने जमीन हस्तांतरणाबाबत आव्हान होतं. मात्र जमीन हस्तांतरित झाल्यानंतर दोन तासांत पैसे खात्यात जमा होतील, असं आपण शेतकऱ्यांना सांगितलं आणि त्यासाठी स्वतः साक्षीदार राहिलो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

७०१ किमीचा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. नागपूरहून सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचू शकतो, असं सांगत शिंदे यांनी या महामार्गामुळे प्रवासासोबतच आर्थिक विकासालाही वेग मिळाल्याचं स्पष्ट केलं. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उद्योग आणि मल्टीनॅशनल कंपन्यांची गुंतवणूक वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गावर टास्क फोर्सची नियुक्ती

दरम्यान समृद्धी महामार्गावर प्रवाशांची सुरक्षितता हे सरकारचं प्रमुख ध्येय असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. महामार्गावर लूटमार किंवा इतर गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment