होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मुंबईसाठी मोठी बातमी: ‘इतक्या’ नवीन एसी लोकल मिळणार; १५ डब्याच्या फेऱ्यातही वाढ

On: April 3, 2026 4:29 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: मुंबई लोकल मधील प्रवाश्यांचा प्रवास गारेगार करण्यासाठी रेल्वेने आणखी एसी लोकल वाढवल्या आहे. मुंबई लोकलमध्ये प्रत्येक प्रवाशाला आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी अधिक डबे जोडण्यात आले आहे. 15-डब्यांच्या फेऱ्या 211 वरून 227 पर्यंत वाढल्या आहेत. सध्या, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेद्वारे एसी ईएमयू सेवांसह एकूण 3234 ईएमयू लोकल सेवा चालवल्या जातात. पश्चिम रेल्वे 133 एसी सेवांसह 1414 फेऱ्या चालवते, तर मध्य रेल्वे 94 एसी सेवांसह 1820 फेऱ्या चालवते, ज्या प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कल्याण, विरार आणि पनवेल येथील आहे. मुंबई परिसरातील विविध स्थानकांवर रेल्वेगाड्यांची हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

प्रवासी नेण्याच्या क्षमतेत वृद्धी घडवून आणण्यासाठी, मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-III आणि IIIA एमटीयूटीपी- ३ आणि ३ ए (MUTP-III & IIIA) अंतर्गत प्रत्येकी 12 डबे असलेल्या 238 रेल्वे गाड्यांकरता 19,293 कोटी रुपये खर्चासह मंजुरी देण्यात आली आहे. या रेल्वे गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

​2025-26 या वर्षा दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत प्रत्येकी 12 डब्यांच्या चार वातानुकूलित ईएमयू रेल्वे गाड्या (मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी 2) आणि पश्चिम रेल्वे सेवेत 15 डब्यांची एक बिगर वातानुकूलित ईएमयू (Non-AC EMU) रेल्वे गाडी दाखल केली आहे. या व्यतिरिक्त, चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने दरवाजे स्वयंचलित पद्धतींने बंद होण्याची यंत्रणा असलेल्या दोन बिगर वातानुकूलित ईएमयू रेल्वे गाड्यांच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. या गाड्या मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत दाखल केल्या जाणार आहेत.

​मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने (MRVC) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-III आणि IIIA अंतर्गत 12 डब्यांच्या 238 गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. केंद्रीय​ रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

भोंदू खरातने राजकीय ओळखीचा फायदा कशासाठी घेतला का? सीडीआरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

प्रतीक्षा संपली; ‘देऊळ बंद २’ २१ मे रोजी होणार प्रदर्शित; लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे यांची माहिती

Ladki Bahin Yojana: महिलांनो लक्ष द्या! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ; नवी तारीख जाहीर

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मास्टर स्ट्रोक, घेतले 6 मोठा निर्णय

शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी; महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ashok Kharat News: अशोक खरात प्रकरणी विजय वड्डेटीवार यांनी केली ‘ही’ मोठी मागणी, नेमके ते काय म्हणाले; जाणून घ्या!

Leave a Comment