होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नंदुरबारमध्ये ‘डीईएफ युरिया’ निर्मिती कारखाना उदध्वस्त, राजस्थानचे तिघे ताब्यात

On: May 7, 2026 6:08 PM
Follow Us:
---Advertisement---

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धनलक्ष्मी पार्क परिसरात एका घरातून बनावट डीईएफ युरियाचा कारखाना उध्वस्त केला आहे. या ठिकाणी बनावट उत्पादन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाला मिळाली, त्यानुसार पोलिसांच्या मदतीने छापा टाकून कारवाई करण्यात आली. त्यामध्ये कच्चा माल, तयार डीईएफ युरियाचा साठा व निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य पथकाने जप्त केले आहे.

नवापूर शहरात मध्यवस्तीत बनावट डीईएफ युरिया निर्मिती कारखाना उदध्वस्त करण्यात कृषी प्रशासनाला यश आले आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथक आणि पोलीस विभागाने ही संयुक्तिक कारवाई केली. त्यात टेक्निकल ग्रेड युरियाच्या ३६ गोण्या,पीव्हीसी टाक्या, फिल्टर, सिलिंडर, विविध कंपन्यांच्या २० लिटरच्या ३८ भरलेल्या बादल्या, सुमारे १३ हजार लिटर तयार डीईएफ युरिया आणि मालवाहू वाहन, असा एकूण सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत राजस्थानमधील बाडमेर येथील गोवर्धनराम चौधरी, जसराम माचरा, व टिकमाराम चुनारामया तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. संबंधीतांकडे कोणताच अधिकृत परवाना नसल्याचे तपासात उघड झाले. संबंधित आरोपी हे अनेक नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट खताचे उत्पादन बनवून बाजारात पुरवठा करत असल्याचा संशय आहे. या प्रकरणी कृषी खात्याने राज्यभरात अशा प्रकारच्या बनावट खत आणि डीईएफ बनवणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबवली जाणार आहे, तसेच या प्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment