होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Crime News: घरासमोर लघुशंका केल्याच्या राग; तरुणावर जीवघेणा हल्ला

On: June 3, 2026 2:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Crime News: घरासमोर लघुशंका केल्याच्या राग आल्याने वाद होत एकावर जीवघेण्या हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, कोल्हे हिल्स परिसरातील सावखेडा शिवारात हा प्रकार घडला. राहुल संतोष वाघुडे याने घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत आरोपींनी राहुल वाघुडे याच्यावर चाकूने छाती व पोटाच्या भागात वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच दुसऱ्या आरोपीने मद्यधुंद अवस्थेत मारहाण करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत. परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी हर्षल संतोष घुगे (वय २०) यांच्या फिर्यादीवरून सुमित लोखंडे व तमन्ना (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment