Naldurg Sucide: संपूर्ण महाराष्टाला हादरवणारी महत्त्वाची घटना समोर आली आहे. तुळजापूरमध्ये असलेल्या नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली आहे.येथील निलंगा तालुक्यातील पौळ अंबुलगा येथील एमएसएफच्या माजी कर्मचारी अश्विनी मनोहर पौळ या राष्ट्रीय महिला कुस्तीपट्टूने आपल्या तीन मुलांसह किल्ल्यातील उपळी बुरुजावरून १०० फुटांवरून उडी मारली. त्यात अश्विनी, साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अडीच वर्षांची मुलगी क्रांतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अडीच वर्षाची वीरावर सध्या उपचार सुरु आहे. या घटनेनंतर अश्विनीच्या वडिलांनी सासरच्यांवर अनेक आरोप केले आहे. तसेच याप्रकरणी गुंग ही दाखल केला आहे.
अश्विनीच्या वडिलांनी मुलीच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केला आहे. नवरा, सासू आणि सासरे यांच्या जाचाला कंटाळून माझ्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सतत फोन करून तिला धमकी द्यायचे, तुला जगू देणार नाही असं ही म्हणायचे. सासरी तिच्यावर खूप दबाव टाकत होते. आम्ही तिला सतत समजवून सांगत होतो पण सासरची लोक तिला सतत टॉर्चर करत होते. मागील ८ दिवसात मुलीसोबत काहीतरी घडलं असावं हा संशय देखील वडिलांनी व्यक्त केला आहे. माझी मुलगी तीन महिन्यापासून माझ्याकडेच राहायला होती. आता मी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस योग्य काय ती कारवाई करतील, असा आरोप अश्विनी पौळचे वडील तानाजी मोहिते यांनी केला आहे.

अश्विनीचे वडील तानाजी मोहिते हे शिक्षक आहे. त्यांना कुस्तीचा नादही आहे. त्यांनी लहानपणापासून अश्विनीला कुस्तीचे धडे दिले होते, ज्यामुळे ती राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. कुस्तीची जिद्द पाहून वडिलांनी तिला घरीच कुस्तीची तालीम तयार करायला लावली. आता पोलिसांकडे तपास सुरु असून त्यांच्या तपासाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. एका गोल्ड मेंडेलिस्ट कुस्तीपटूला असे टोकाचे पाऊल उचलावे लागले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का लागला आहे.
आश्विनीने २००७ मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तर २००८ आणि २००९ मध्ये तिने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवलं होतं.










