होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

लोकमाता अहिल्यादेवींचा वारसा कृतीतून जपणे हीच खरी आदरांजली: आ. सत्यजीत तांबे

On: May 31, 2026 7:27 PM
Follow Us:
---Advertisement---

Chalisgaon News: लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चाळीसगाव येथे आयोजित भव्य बाईक रॅलीत आमदार सत्यजीत तांबे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी आमदार तांबे यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, सुशासन आणि समाजसेवेच्या माध्यमातून अहिल्यादेवींनी उभा केलेला आदर्श आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा केवळ स्मरणात न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून जपणे आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत आ. तांबे यांनी यावेळी व्यक्त केले.

या भव्य बाईक रॅलीत मोठ्या संख्येने युवक, नागरिक आणि अहिल्यादेवींचे अनुयायी सहभागी झाले होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या रॅलीमुळे चाळीसगाव शहरात जयंती उत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

जिल्ह्यातील एक सत्र शाळांच्या वेळेत बदल करा: समन्वय समितीची मागणी

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि खरीप हंगामाचा मुख्य सचिवांकडून आढावा

अवैध वाळू वाहतुकीवर प्रांत अधिकाऱ्यांची धडक कारवाई; ४६ लाखाचा मुद्देमाल ताब्यात, वाळूने भरलेले दोन डंपर जप्त

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा, पोलिसांनी सुमारे ८ लाखांचा दंड केला वसूल!

गोदावरीच्या किनारी आढळली एक काळ्या रंगाची सुटकेस, चैन उघडल्यावर पोलीसांना ही बसला धक्का!

नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला समाजापुढे नवा आदर्श; स्वतःच्या मुलांचा शासकीय शाळेत केला प्रवेश

Leave a Comment