होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दिवसभर ऊन, ढगाळ हवामान आणि असह्य उकाडा; जळगावकरांच्या जीवाची होतेय काहिली!

On: June 7, 2026 7:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: राज्याचे तापमान बऱ्यापैकी उतरले आहे, ७ ते १० जून दरम्यान हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे येलो अलर्ट दिला असून सोसाट्याचा वारा आणि मेगगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे, राज्यात मान्सूनचा पाऊस हा १५ जूननंतर सर्वत्र सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने पूवीच दिला आहे. मात्र मान्सूनपूर्व पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, शनिवारी जळगावमध्ये अर्धातास पाऊस झाला, त्यामुळं उकड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र रविवारीही दिवसभर ऊन, ढगाळ हवामान आणि उकाडा असे वातावरण होते. उकाडा मात्र दिवसभर जाणवत असल्याने नागरिकांची एक प्रकारे परीक्षाच बघितली, आज देखील जळगावचे तापमान ४१.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.

विदर्भात ४१ ते ४३ अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली आले आहे, मध्य महाराष्ट्रात ही ३५ ते ४१ अंशाच्या दरम्यान आहे, या ठिकाणी प्रचंड उकाडा जाणवत आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.३ अंश सेल्सियस नोंदवले गेला आहे. तर सर्वात कमी कमाल तापमान २९.३ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे, संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोंकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ व विदर्भात तुरळक ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस आज ७ जून रोजी पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात, संपूर्ण ईशान्य बंगालचा उपसागर; वायव्य बंगालचा उपसागराचा आणखी काही भाग, संपूर्ण नागालैण्ड, मणिपूर आणि मिझोरम आणि त्रिपुरा, आसाम व अरुणाचल प्रदेशच्या काही भागामध्ये दाखल झाला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३६.०,
सांताक्रूझ ३५.५,
रत्नागिरी ३३.९ ,
पणजी (गोवा) ३३.२-,
डहाणू ३८.१, पुणे ३७.७,
लोहगाव ३७.४,
अहिल्यानगर ३९.०,
जळगाव ४१.६,
कोल्हापूर ३४.९,
महाबळेश्वर २९.३,
मालेगाव ४२.०,
नाशिक ३६.५,
सांगली ३६.०,
सातारा ३६.७,
सोलापूर ३८.६,
धाराशिव ३७.१,
छत्रपती संभाजीनगर ३९.७,
परभणी ३८.५,
बीड ३९.२,
अकोला ४३.३,
अमरावती ४१.४,
बुलढाणा ३९.५,
ब्रह्मपुरी ४३.२,
चंद्रपूर ४२.४,
गोंदिया ४०.३,
नागपूर ४१.६
वाशीम ४०.४,
वर्धा ४३.०,
यवतमाळ ४०.६.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment