होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नंदुरबारात दोघांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा

On: January 16, 2026 5:31 AM
Follow Us:
---Advertisement---

नंदुरबार : हनीट्रॅपच्या माध्यमातून दोघांकडून चार लाखांची मागणी केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी संबंधित दोन्ही महिला व इतर तिघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, गांधीनगरनजीक असलेल्या एका ट्रेडर्समध्ये अनिल शांतिलाल पाटील, रा. डोंगरगाव, ता. शहादा यांना व त्यांच्या मित्रास महिलेने बोलावून घेतले. तेथीलच एका घरात त्याला घेऊन जाऊन एका महिलेसोबत उभे केले व कपडे काढण्यास सांगितले.

त्याचवेळी सोनू अनिल करमरकर, दशरथ शिंदे हे तिथे आले व त्यांनी व्हिडीओ तयार करून घेतला. त्यानंतर काही वेळात गोपाल माळी हा तेथे आला व त्याने पोलिस असल्याची बतावणी केली.

अनिल पाटील व त्याचा मित्र संदीप नागो पाटील यांना या प्रकरणात तुमची मोठी बदनामी होईल. त्यामुळे समझोता करून देत असल्याचे सांगून चार लाख रुपयांची मागणी केली. यामुळे धास्तावलेल्या दोघांनी त्यांच्यापासून सुटका करून घेत दुसऱ्या दिवशी नंदुरबार शहर पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली.

अनिल पाटील याच्या फिर्यादीवरून दोन्ही महिला आणि सोनू करमरकर, दशरथ शिंदे व गोपाल माळी सर्व रा. नंदुरबार यांच्याविरुद्ध तोतयेगिरी करून पैशांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार किरण पाटील करीत आहेत. पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

भारतीय संघात बदलाची तयारी: ‘श्रेयस अय्यर’कडे टी-२० कर्णधारपद? वैभव सूर्यवंशीची वर्णी लागणार

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज कसा राहील ‘ते’ जाणून घ्या

अकरावी प्रवेश: दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर महाविद्यालय पसंती नोंदणी “या” तारखेला होणार सुरू

प्रवाश्यानो लक्ष द्या: धुळे आणि पंचवटी एक्सप्रेस शनिवारी धावणार नाही, या कारणाने गाड्या रद्द; इतर गाड्यांविषयी जाणून घ्या

मुंढेंचा धडाका सुरूच! २०३ आस्थापनांवर कारवाई; ‘इतक्या’ जणांना अटक

जळगावकरांना मिळणार दिलासा: ५ जूनला मुसळधार पावसाची शक्यता; देशासह राज्यातील पावसाची स्थिती कशी राहील ‘ते’ जाणून घ्या!

Leave a Comment