होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Iranian Woman Story : ती गर्भवती अन् पतीचा खून; इराणी महिला धरणगावात कशी आली?

On: February 3, 2026 11:00 AM
Follow Us:
---Advertisement---

Iranian Woman Story : जळगावच्या धरणगावात अवैधरित्या वास्तव्यास आढळलेल्या इराणी महिलेचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः ती धरणगावात कशी आली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

फरनाज हमीज रेझा (३८  असे या इराणी महिलेचे नाव. तिचे इराणमध्ये वास्तव्यास व अफगाणिस्तानातील रहिवासी सय्यद जरिफ अहमद चिश्ती उर्फ जरिफ बाबा (३५) याच्याशी प्रेमसंबंध जुळले.

काही काळानंतर जरिफ बाबा इराण सोडून भारतात आला आणि ‘रेफ्युजी’ म्हणून दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यात वास्तव्य केले. फरनाज हिने जरिफ बाबा याचे पहिले लग्न झाल्याची माहिती असताना, त्याच्याशी विवाह केला. ती गर्भवती राहिली व मुलाला जन्म दिला.

अशात ५ जुलै २०२२ ला जरिफ बाबा यांची संशयित पूर्वाश्रमीचा चालक अब्दुल गफ्फार याच्यासह संतोष हरिभाऊ ब्राह्मणे, गोपाल निंबा बोरगुले, विशाल सदानंद पिंगळे यांनी गोळी झाडून हत्या केली.

फरनाज हिच्यावर पती जरिफ बाबाच्या मृत्युसोबतच ७ फेब्रुवारी २०२२ ला ‘व्हिसा’ संपुष्टात आल्याने अनेक संकटे आली. या प्रकरणी अटकेत असलेला जरिफ बाबाचा चालक अब्दुल गफ्फार यानेच तिला महाराष्ट्रात आणले होते.

पती जरिफचा खून गफ्फारनेच केल्याचे व त्याला अटक झाल्यानंतर फरनाजने त्याची साथ सोडून ती धरणगावातील रफिक कुरेशी याच्या संपर्कात आली. दरम्यान, कुरेशी यानेच खोटे दस्तऐवज बनविण्यासाठी मदत केल्याचे पोलीस तसापात उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

बाळासह देशात घेण्यास इराणचा नकार

दुसरीकडे मात्र  फरनाज रेझा हिला बाळासह देशात घेण्यास मूळ देश इराणने नकार दिला आहे. अर्थात इराण केवळ या महिलेस देशात घेण्यास तयार आहे. मात्र, आईचे नागरिकत्व थेट अपत्यांना दिले जात नसल्याने मुलाला इराण दुतावासाने नकार दिल्याने फरनाज रेझा तीन देशांच्या सिमेंतर्गत विदेशी नागरिकत्व कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.

सखोल चौकशी सुरू – पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

आश्रय देणाऱ्यांना अटक केली असून, या प्रकरणात सखोल चौकशी सुरू आहे. या महिलेबाबत तिच्या मूळ देशाच्या दुतावासांना माहिती देण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार पोलिस दलाचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment