होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Republic Day 2026 : जळगावची हिमानी पिले ‘भारत की झांकी’मध्ये चमकणार!

On: January 25, 2026 11:13 AM
Follow Us:
---Advertisement---

Republic Day 2026 : जळगावच्या पारोळ्यातील हिमानी संजय पिले ही राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये ‘भारत की झांकी’ या अंतर्गत कथ्थक नृत्यात सादर करणार आहे.

हिमानी हिने वयाच्या सहाव्या वर्षापासून कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून, पुणे येथील भारती विद्यापीठातून एम. ए. कथ्थक हे शिक्षण पूर्ण केले आहे. आजपर्यंत हिमानीचे कथ्थक क्लासिकल नृत्याचे ओरिसातील कटक, अहमदाबाद, मुंबई, पुणे येथे अनेक कार्यक्रम झालेले आहेत.

दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ‘भारत की झांकी’ या प्रकारात कथ्थक नृत्याच्या सादरीकरणात संपूर्ण भारतातून सर्वोत्कृष्ट तीनशे विद्यार्थिनी सहभागी झाल्या असून, यात प्रमुख नृत्यांगना म्हणून हिमानीची निवड झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment