होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Weather Update : जळगावसह उत्तर महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव; पुढील २४ तासांत…

On: January 27, 2026 5:05 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Weather Update : जळगावसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशात पुन्हा हवामान बदल होण्याचे संकेत असून, येत्या २४ तासांत जळगावसह काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा जोर कमी होऊन उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील सक्रिय पश्चिमी चक्रवाताचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत ढगांची दाटी वाढणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान बदल जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहील, तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बसण्याचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणाची तीव्रता वाढणार असून, हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. यामुळे रात्रीचा गारठा काहीसा कमी होणार आहे.

दरम्यान, २९ आणि ३० जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात पहाटे दाट धुक्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी राहील. मात्र दुपारनंतर सूर्यप्रकाश तीव्र राहणार असून, तापमान ३० अंशापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे पहाटे धुके आणि दिवसा उन्हाचा चटका असे समित्र हवामान अनुभवायला मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

अमळनेर तालुक्यात भूजलपातळी घटली! पाडळसरे परिसरातील तापी, बोरी, पांझरा पट्ट्यात केळी, पपईला बसला फटका

Leave a Comment