Bank Rules Change : उद्या रविवारी (१ फेब्रुवारी २०२६ ) SBI, HDFC, ICICI आणि PNB या चार बँकांचे काही नियम बदलणार आहेत. हे बदल ग्राहकांच्या दैनंदिन बँकिंग व्यवहार, IMPS व्यवहार शुल्क, क्रेडिट कार्ड फायदे आणि अपडेट्स यावर थेर परिणाम करणार आहेत. त्यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी असून, नेमके काय बदल होणार आहेत, जाणून घेऊया.
SBI चे नवीन नियम
SBI IMPS व्यवहार शुल्कात बदल करणार असून, २५,००० ते १ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर रु २ +GST, १ लाख ते २ लाख रुपयांपर्यंत रु ६ +GST, आणि २ लाख रुपयांपर्यंत रु १ ० + GST आकारले जातील.
ICICI चे नवीन नियम
ICICI काही क्रेडिट कार्डवर उपलब्ध बुक मायशो मोफत चित्रपट तिकिटाचा लाभ बंद करणार असून, रिवोर्ड पॉईंट्स आणि इतर फायदे कायम राहणार आहे.
HDFC चे नवीन नियम
HDFC प्रीमियम इन्फिनिया मेटल कार्डसाठी रिवोड पॉईंट रिडंप्शनची मर्यादा लागू करण्यात येणार असून, आता ग्राहक दरमहा ५ वेळा पॉईंट्स रीडिम करू शकणार आहेत.
PNB चे नवीन नियम
PNB ने ग्राहकांना २ फेब्रुवारी २ ० २ ६ पर्यंत KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे वेळेवर अपडेट न केल्यास खात्यातील व्यवहारांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
Health Tips : तुमच्या घरातही लहान मुलं, पाळीव प्राणी आहेत? मग ही झाडे लावू नका; अन्यथा…









