होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Shimron Hetmyer : उद्यापासून विश्वचषक अन् शिमरॉन हेटमायर दक्षिण आफ्रिकेत अडकला, काय कारण?

On: February 7, 2026 4:24 PM
Follow Us:
---Advertisement---

Shimron Hetmyer : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 उद्या 7 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिज संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर अद्याप भारतात दाखल झालेला नसून, व्हिसा समस्येमुळे तो दक्षिण आफ्रिकेत अडकला आहे. परिणामी वेस्ट इंडिजच्या तयारीला मोठा फटका बसला आहे.

वेस्ट इंडिज उद्या 7 फेब्रुवारी रोजी स्कॉटलंडविरुद्ध त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. मात्र, हेटमायर अजूनही व्हिसा समस्येमुळे जोहान्सबर्गमध्ये अडकला आहे.

हेटमायरने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याने मालिकेत सर्वाधिक 171 धावा केल्या, ज्यात त्याचा सर्वोत्तम स्कोर 75 होता.

२०२२ मध्येही अशाच एका घटनेमुळे चर्चेत

दरम्यान, शिमरॉन हेटमायर 2022 मध्येही अशाच एका घटनेमुळे चर्चेत होता. टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या शिमरॉन हेटमायरची नियोजित फ्लाइट चुकवल्यानंतर त्याला टी-20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले. नंतर हेटमायरच्या जागी शमारह ब्रूक्सचा संघात समावेश करण्यात आला.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment