होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Holi Special Trains 2026: होळीनिमित्त रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट; मध्य रेल्वेतून धावणार 24 अतिरिक्त विशेष गाड्या

On: February 21, 2026 5:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Holi Special Trains 2026: रेल्वे प्रशासनाने होळी सणानिमित्त प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावर या काळात विशेष रेल्वे धावणार आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतून 24 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या धावणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच त्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – कानपूर आणि पुणे/हडपसर- झांसी दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन या 24 अतिरिक्त होळी विशेष गाड्या धावणार आहेत.

मध्य रेल्वेने यापूर्वी 216 होळी विशेष गाड्यांची घोषणा केली होती. आता नव्याने 24 अतिरिक्त होळी विशेष गाड्यांच्या घोषणेसह एकून 240 गाड्या धावणार आहेत.

होळी दरम्यान धावणार ‘या’ विशेष गाड्या

लोकमान्य टिळक टर्मिनस- कानपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (8 सेवा)

 

ट्रेन क्रमांक 04152 साप्ताहिक सुपरफास्ट ही विशेष गाडी 7 मार्च 2026 ते 28 मार्च 2026 पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी 17 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि कानपूर सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी 15 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. (4 सेवा)

ट्रेन क्रमांक 04151 साप्ताहिक सुपरफास्ट ही विशेष गाडी  6 मार्ट 2026 ते 27 मार्च 2026 दरम्यान कानपूर सेंट्रल येथून दर शुक्रवारी 13 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 14 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. (4 सेवा)

थांबे – या गाड्यांना भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, धाभौरा, प्रयागराज, भारवारी, सिरथू आणि फतेहपूर आदी ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

संरचना- 1 वातानुकूलित तृतीय, 4 वातानुकूलित तृतीय, 9 शयनयान, 8 सामान्य द्वितीय आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

पुणे – झांसी – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (8 सेवा)

ट्रेन क्रमांक 01921 साप्ताहिक सुपरफास्ट ही विशेष गाडी  5 मार्च 2026 ते 26 मार्च 2026 पर्यंत पुणे येथून दर गुरुवारी 15 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि विरांगना लक्ष्मीबाई झांसी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचेल. (4 सेवा)

ट्रेन क्रमांक 01922 साप्ताहिक सुपरफास्ट ही विशेष गाडी 4 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 पर्यंत विरांगना लक्ष्मीबाई झांसी येथून दर बुधवारी 12 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 11 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. (4 सेवा)

थांबे- दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, विदिशा, बिना आणि ललितपूर.

संरचना- 1 वातानुकूलित द्वितीय, 3 वातानुकूलित तृतीय, 7 शयनयान, 4 सामान्य द्वितीय आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

हडपसर- झांसी – हडपसर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (8 सेवा)

ट्रेन क्रमांक 01923 साप्ताहिक सुपरफास्ट ही विशेष गाडी 8 मार्च 2026 ते 29 मार्च 2026 पर्यंत हडपसर येथून दर रविवारी 19 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि विरांगना लक्ष्मीबाई झांसी येथे दुसऱ्या दिवशी 15 वाजता पोहोचेल. (4 सेवा)

ट्रेन क्रमांक 01924 साप्ताहिक सुपरफास्ट ही विशेष रेल्वे 7 मार्च 2026 ते 28 मार्च 2026 पर्यंत विरांगना लक्ष्मीबाई झांसी येथून दर शनिवारी 19 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि हडपसर येथे दुसऱ्या दिवशी 16 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. (4 सेवा)

थांबे – दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती आणि बिना.

संरचना -1 वातानुकूलित द्वितीय, 3 वातानुकूलित तृतीय, 7 शयनयान, 4 सामान्य द्वितीय आणि 2 सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment