होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

EPFO : नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! ईपीएफओनं व्याजदराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

On: March 2, 2026 5:45 PM
Follow Us:
---Advertisement---

EPFO Update: सरकारी तसेच खासगी क्षेत्रातीली नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ संदर्भात ही अपडेट आहे. केंद्रीय ट्रस्ट बोर्डाची 239 वी बैठकीत नुकतीच पार पडली. यात ईपीएफओनं 2025-26 साठी व्याज दर 8.25 टक्के ठेवण्याची शिफारस केली असल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या बैठकीत अध्यक्ष केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय, राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि श्रम आणि रोजगार विभागाच्या सचिववंदना गुरनानी यांच्यासह ईपीएफओच्या रमेश कृष्णमूर्ती यांचा समावेश होता.

ईपीएफओच्या ट्रस्ट मंडळाकडून निर्णय घेतल्यांनतर प्रस्तावित व्याज दराबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाला पाठवण्यात येईल. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर 7 कोटी ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यात रक्कम जमा होईल.  ईपीएफओकडून जमा असलेल्या रकमेवर दरमहा व्याजाची रक्कम मोजली जाते. मात्र, प्रत्यक्ष व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी दिलं जातं.

ईपीएफओनं 2023-24 मध्ये व्याज दर 8.15 टक्क्यांवरुन वाढवून 8.25 टक्के केला होता. गेल्या दोन वर्षात 8.25 टक्के व्याज दर कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे ईपीएफओनं व्याज दरात सलग तिसऱ्या वर्षी कोणताही बदल केलेला नाही. जागतिक अनिश्चिततेचं वातावरण, मजबूत आर्थिक शिस्त, शाश्वत आणि स्पर्धात्मक परतावा या सूत्रांनुसार ईपीएफओ काम करत असून. यामुळं ईपीएफओनं चांगल्या प्रकारे व्याज दर दिल्याचं सांगण्यात आलं.

तर एखादं खात्यात 36 महिन्यांपासून रक्कम जमा होत नसेल खातं बंद केलं जातं. अशात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजकडून  एका पायलट प्रोजेक्टच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ज्यांच्या खात्यात 1000 रुपये आणि त्यापेक्षा कमी रक्कम असेल त्यांच्या क्लेम ऑटोमेटिक मंजूर केले जातील, आणि ती रक्कम खातेदारांना दिला जाईल. पहिल्या टप्प्यात 1.33 लाख खाती निश्चित करण्यात आली आहेत, त्यानुसार ईपीएफओ 5.68 कोटी रुपये खातेदारांच्या खात्यात पाठवणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment