Summer Health Tips : सध्या उन्हाळा सुरू आहे. इतर ऋतुच्या तुलनेत उन्हाळ्यात आरोग्याच्या समस्या अधिक उद्भवतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या प्रामुख्याने जाणवते. त्यामुळे शरीराला जास्त हायड्रेटेड ठेवण्याची गरज असते. या ऋतूमध्ये वाढत्या तापमानामुळे जास्त घाम येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. तसेच थकवा जाणवतो. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिण्याची गरज असते. या लेखात आपण शरिराला डिहायड्रेसनपासून वाचवण्यासाठीचे सोपे उपाय जाणून घेणार आहोत.
पाणी
उन्हाळ्यात शरीरातील पाणी झपाट्याने कमी होतं. त्यामुळे दिवसभरात किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यायला हवे. वजन कमी करण्यासाठीही अनेक जण जास्त पाणी पितात. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य असल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण काही लोकांना नुसतं पाणी प्यायला आवडत नाही. नुसतं पाणी प्यायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही लिंबू पाणी किंवा लिंबू सरबतही तयार करु शकता. किंवा त्यात ओवा अथवा बडीशेप टाकू शकता. यासह चिया सीड्स, तुळस, पुदिना इत्यादी पाण्यात टाकून ठेवा आणि ते पाणी प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.
नारळ पाणी, दूध किंवा लस्सी
थ्री ड्रिंक्स थिअरीच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या पेयाचं सेवन करु शकता. नारळ पाणी, लस्सी किंवा दूध हे उत्तम पर्याय आहे. हायड्रेशनसाठी हे ड्रिंक्सचे चांगले पर्याय आहेत. पण चहा किंवा कॉफी पिणं टाळावं. कारण त्यात कॅफिन असते. कॅफिनमुळे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. चहा किंवा कॉफी प्यायची असेल तर दिवसातून दोन वेळाच प्या.
ज्यूस
थ्री ड्रिंक्स थिअरीनुसार तिसऱ्या टप्प्यात, फळे आणि भाज्यांचा रसाचे सेवन फायदेशीर आहे. उन्हाळ्यात फळांचे आणि भाज्यांचे रस प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहील. डाळिंब, पपई, अननस, मोंसबी आणि आंब्याचा रस तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. तुम्ही कलिंगड, काकडी, द्राक्षे, ब्लूबेरी, मुळा, बीट, सफरचंद आणि टोमॅटो खाऊ शकता. यातील रस पोटात गेल्यानेही शरीर हायड्रेटेड राहते.
(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)










