America Israal Iran War: होर्मुजची खाडी बंद असल्याने इराणच्या भीतीने गॅस आणि तेलाची वाहतूक करणे या समुद्री मार्गावरून इतर देशांना कठीण झाले आहे. त्यामुळे जगभरात तेल आणि वायूचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अलिप्त असलेल्या काही अमेरिकेचे सहयोगी ब्रिटनसह सहा देश या ठिकाणी आपल्या युद्धनौका पाठवून होर्मुज खाडी सुरक्षित करून तेल आणि गॅस वाहतूक सुरळीत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या निर्णयानंतर इराण आपली प्रतिक्रिया देतांना, या देशांना ही अमेरिका इस्रायल सारखे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे.
युद्धाचा आजचा २१ वा दिवस आहे, मात्र युद्ध लांबत चालल्याने अनेक देशांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. इराण आपल्या मित्र राष्ट्रांनाच होर्मुज खाडीतून प्रवेश देत आहे. इतर कोणत्याही देशाला तेल आणि गॅसची वाहतूक करण्यास मनाई करत आहे. त्यामुळे युरोपातील काही देशांना त्याचा फटका बसला आहे. आता अमेरिका हा मार्ग सुरक्षित करण्यासाठी आपले तिसरे एअरक्राफ्ट कॅरियर पाठवण्याची तयारी करत आहे. त्यापाठोपाठ आता ब्रिटनसह सहा देश हा मार्ग सुरळीत करण्यासाठी आपले नौदल पाठवित आहे. या निर्णयाने इराण संतापला आहे. होर्मुज खाडीत आल्यास अमेरिका इस्रायल सारखा धडा शिकवू , असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.
इराणने अमेरिकेच्या पश्चिम आखातात असलेल्या सर्वच स्थळांवर हल्ले करून अमेरिकेला बेजार केले तसेच ज्या देशांनी अमेरिकेला बेस दिले त्या सर्व देशांवर हल्ले करून पायाभूत सुविधा आणि तेल आणि वायू साठे असलेल्या ठिकाणांना लक्ष केले. (युएई) दुबईवर देखील हल्ले केले, कतार आणि सौदीला ही लक्ष केले. आता ब्रिटेनसह सहा देश या ठिकाणी येत आहे, त्यामुळे हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्याने गॅस आणि तेलाची समस्या तुर्तास तरी सुटण्याची चिन्हे दिसत नाही.
सोबतच्या युद्धात अमेरिका कुठे ना कुठे मागे पडल्याचे बघायला
प्रारंभी अमेरिकेच्या मदतीला एका ही देश पुढे येत नव्हता
त्यामुळे होर्मुज खाडी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आणखी एका एअरक्राफ्ट करिअर होर्मुजच्या दिशेने रवाना केले आहे. युद्धाचे स्वरूप दिवसंदिवस आणखी भयावह होता आहे.










