होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

उन्हाळ्यात करा ‘या’ 4 गोष्टींचे सेवन; शरीरात उर्जा निर्माण होत हृदय होईल मजबूत

On: April 9, 2026 2:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Summer Health Tips: उन्हाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशात आरोग्य आणि आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते. उन्हाळ्यात प्रमुख्याने डिहायड्रेशन (शरीरातील पाण्याची कमतरता) आणि ऊर्जेची कमतरता यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आपल्या आहारात अशा पोषक तत्वांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, जे शरीराला थंडावा देतात, शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवतात. उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी काही सीड्सचे सेवन हा एक उत्तम पर्याय ठरतो. त्यामुळे आपल्या आहारात कोणत्या बियांचा (सीड्स) समावेश केला पाहिजे जाणून घेऊया.

 

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, बी व्हिटॅमिन्स आणि मॅग्नेशियम व सेलेनियम सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. तसेच यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते. उन्हाळ्यात सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्याने डिहायड्रेशनचा सामना करण्यास मदत होते. शिवाय, सूर्यफुलाच्या बियामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवतात आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतात.

 

जवस

जवसमध्ये ओमेगा-3, फायबर आणि लिग्नॅन्स सारखी पोषक तत्वे असतात, जी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. जवस केवळ वजन कमी करत नाहीत, तर शरीरातील अंतर्गत अवयव स्वच्छ करण्यासही मदत करते. उन्हाळ्यात जवस खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. याव्यतिरिक्त, त्वचेला आर्द्रता मिळत सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते.

 

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. या बिया रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात त्यांचे सेवन केल्याने ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण सुधारण्यास मदत होते. भोपळ्याच्या बिया त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतात. त्यातील झिंकमुळे केसांचे आरोग्य राखण्यास आणि त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत होते.

 

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड, फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या बियांमध्ये पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता डिहायड्रेशनला प्रतिबंध करते, ज्यामुळे डिहायड्रेशनपासून आराम मिळतो. चिया सीड्सचे सेवन त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे, कारण त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड त्वचेचा पोत सुधारत त्वचेला चमकदार बनवते.

 

(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment