होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

NITA : नाशिकच्या आयटी क्षेत्राची मान खाली घालणारी घटना; आयटी असोसिएशनकडून तीव्र निषेध..!

On: April 10, 2026 2:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशन (NITA) शहरातील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत नोकरीच्या आमिषाने महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार, मानसिक शोषण आणि धार्मिक छळाच्या प्रकाराचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या चार वर्षांत १८ ते २५ वयोगटातील आठ महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. आरोपींनी मुलाखतीपासूनच महिलांची आर्थिक असहायता हेरून त्यांना जाणीवपूर्वक सावज बनवले. या प्रकरणी सहा आरोपींना अटक होऊन एकूण नऊ गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलीस आयुक्त संदीप कार्निक यांच्या आदेशाने SIT स्थापन झाली आहे. NITA पीडित महिलांच्या खंबीरपणे पाठीशी आहे आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी ठाम मागणी करते.

या प्रकरणाबाबत (NITA) ‘एनआयटीए’ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

* तीव्र निषेध : कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांशी असे क्रूर, शोषणकारी आणि बेकायदेशीर वर्तन करणे हे आमच्यासाठी पूर्णतः अस्वीकार्य आहे. नोकरीचे आमिष दाखवून, आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेऊन आणि उपकृत केल्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणे ही ‘मोडस ऑपरंडी’ म्हणजे सुनियोजित गुन्हेगारी कट आहे. NITA या कृत्याचा संपूर्ण धिक्कार करते.

* पीडित महिलांच्या पाठीशी- तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवणाऱ्या सर्व आठ महिला कर्मचाऱ्यांचे NITA अभिनंदन करते. त्यांनी न्यायासाठी उभे राहणे हे केवळ त्यांच्यासाठी नव्हे, तर भविष्यात अशा धोक्यांपासून इतर महिलांना वाचवण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. NITA त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

* त्वरित व कठोर न्यायाची मागणी : SIT तपास जलद गतीने होऊन आरोपींवर जास्तीत जास्त कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी NITA मागणी करते. ज्या एचआर अधिकारी फरार आहेत, त्यांना तातडीने अटक व्हावी आणि या संपूर्ण रॅकेटची मूळापासून चौकशी व्हावी, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.

४. कंपनी व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व : पीडित महिलांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतरही कोणतीही कारवाई न करणे हे घोर निष्काळजीपणाचे आहे. POSH (Prevention of Sexual Harassment) कायद्याअंतर्गत कंपनी व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी NITA ची मागणी आहे.

५. आयटी क्षेत्रातील सर्व कंपन्यांना आवाहन : नाशिकमधील सर्व आयटी व तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या अंतर्गत तक्रार समित्या (Internal Complaints Committee – ICC) कार्यान्वित व सक्षम असल्याची खातरजमा करावी. POSH कायद्याची अक्षरशः अंमलबजावणी करावी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, सन्मानजनक कामाचे वातावरण निर्माण करणे ही कंपनीची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, याची जाणीव ठेवावी.

नाशिकचे आयटी क्षेत्र हे शहराच्या प्रगतीचे प्रतीक आहे. येथे काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळणे हा तिचा हक्क आहे आणि तो अबाधित राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

 

आयटी कंपन्यांनी ‘पोश’ धोरणाचा आढावा घ्यावा!

ही घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. मात्र यातून आपण सर्वांनी एक महत्त्वाचा धडा घ्यायला हवा. नाशिकमधील प्रत्येक आयटी कंपनीच्या मालकांनी व HR विभागांनी आत्ताच आपल्या POSH धोरणांचा आढावा घ्यावा. कागदावरील नियम प्रत्यक्षात कार्यान्वित आहेत का, ICC सक्रिय आहे का, हे तपासणे ही आजची तातडीची जबाबदारी आहे. NITA केवळ निषेध नोंदवण्यापुरती मर्यादित राहणार नाही आम्ही लवकरच सदस्य कंपन्यांसाठी POSH जागृती कार्यशाळा व HR प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहोत, जेणेकरून असे प्रकार नाशिकच्या आयटी क्षेत्रात पुन्हा घडणार नाहीत.

– अमर ठाकरे, अध्यक्ष एनआयटीए (NITA )

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment