होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

New Railway Update: रेल्वेतर्फे सीएसटी –हैदराबाद, सांतरागाछी आणि पुणे–सांतरागाछी दरम्यान विशेष गाड्या

On: April 13, 2026 7:12 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusaval News: उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाश्यांची गर्दी वाढत आहे. उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद , सांतरागाछी आणि पुणे ते सांतरागाछी दरम्यान अतिरिक्त विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय टळणार आहे. या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद साप्ताहिक विशेष ट्रेन (२४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01011 साप्ताहिक विशेष दिनांक २३ एप्रिल ते ०९. जुलै या कालावधीत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर गुरुवारी ००.२० वाजता सुटेल आणि हैदराबाद येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल. (१२ सेवा) ट्रेन क्रमांक 01012 साप्ताहिक विशेष दिनांक २३ एप्रिल ते ०९. जुलै या कालावधीत असेल, हैदराबाद येथून दर गुरुवारी २२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १९.५० वाजता पोहोचेल. (१२ सेवा) थांबे: दादर,ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, पूर्णा, हजुर साहेब नांदेड, मुदखेड, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, बोलारम आणि सिकंदराबाद आदींचा समावेश आहे. संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी आहे.

२) लोकमान्य टिळक टर्मिनस – सांतरागाछी विशेष ट्रेन (०४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01127 विशेष दिनांक २४ एप्रिल ते १ मे .२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.१५ वाजता सुटेल आणि सांतरागाछी येथे दुसऱ्या दिवशी ०७.०० वाजता पोहोचेल.(२ सेवा), ट्रेन क्रमांक 01128 विशेष दिनांक २५ एप्रिल ते ०२ मे रोजी सांतरागाछी येथून १५.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.५० वाजता पोहोचेल. (२ सेवा), थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, आणि खरगपूर असतील, संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ९ वातानुकूलित तृतीय, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार आहे.

३) लोकमान्य टिळक टर्मिनस – सांतरागाछी विशेष ट्रेन (०४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01041 विशेष दिनांक १७ एप्रिल आणि २४ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.५० वाजता सुटेल आणि सांतरागाछी येथे दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा) ट्रेन क्रमांक 01042 विशेष दिनांक १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी सांतरागाछी येथून ०५.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा), थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, आणि खरगपूर असे आहेत. संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असे आहेत.

४) पुणे – सांतरागाछी विशेष ट्रेन (०४ सेवा) ट्रेन क्रमांक 01429 विशेष दिनांक १५ एप्रिल आणि २२ एप्रिल रोजी पुणे येथून १०.०० वाजता सुटेल आणि सांतरागाछी येथे दुसऱ्या दिवशी २१.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा) ट्रेन क्रमांक 01430 विशेष दिनांक १७ एप्रिल आणि २४ एप्रिल रोजी सांतरागाछी येथून १५.४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०५.१५ वाजता पोहोचेल.(२ सेवा), थांबे -: दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर आदी आहेत. संरचना: १ वातानुकूलित प्रथम, १ वातानुकूलित द्वितीय, ३ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असे आहेत.

५) पुणे – सांतरागाछी विशेष ट्रेन (०४ सेवा), ट्रेन क्रमांक 01441 विशेष दिनांक १७ एप्रिल आणि २५ एप्रिल रोजी पुणे येथून १०.०० वाजता सुटेल आणि सांतरागाछी येथे दुसऱ्या दिवशी २१.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा) ट्रेन क्रमांक 01442 विशेष दिनांक १९ एप्रिल आणि २७ एप्रिल २०२६ रोजी सांतरागाछी येथून १५.४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०५.१५ वाजता पोहोचेल. (२ सेवा) थांबे -: दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर.
संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १६ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन असा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment