होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादला भेट देणार नाही; अमेरिका-इराण वाटाघाटीला ब्रेक?

On: April 21, 2026 3:03 PM
Follow Us:
---Advertisement---

United Arab Amirat: अमेरिकेसोबत संभाव्य दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू असतांनाच, इराणच्या सरकारी दूरदर्शनने मंगळवारी एक ऑन-स्क्रीन सूचना जारी केली, ज्यात म्हटले की, “आतापर्यंत इराणचे कोणतेही शिष्टमंडळ इस्लामाबादला भेट देणार नाही.” मागील काही दिवसांच्या तणावपूर्ण आरोप प्रत्यारोपाने वाटाघाटीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे, तसे वृत्त असोशिएटेड प्रेसने दिले आहे.

अमेरिकेने आठवड्याच्या शेवटी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणचा ध्वज असलेले एक जहाज जप्त केल्यामुळे इराणी अधिकारी संतप्त झाले आहेत आणि जागतिक तेल किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये या आठवड्यात होणारी अमेरिका-इराण शांतता चर्चेची दुसरी फेरी अनिश्चिततेत असताना हा शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे.

आठवड्याच्या शेवटी अमेरिकेच्या नौदलाने एका इराणी कंटेनर जहाजावर केलेल्या कब्जाला कशी प्रतिक्रिया द्यावी, यावर इराणच्या धर्मसत्ताक राजवटीत सुरू असलेल्या अंतर्गत चर्चेचे प्रतिबिंब या ऑन-स्क्रीन सूचनेतून दिसण्याची शक्यता आहे.इराणचे सरकारी टीव्ही दीर्घकाळापासून इराणच्या धर्मसत्ताक राजवटीतील कट्टरपंथीयांच्या नियंत्रणाखाली आहे.

आतापर्यंत कोणतेही शिष्टमंडळ इस्लामाबादला जाणार आहे, अधिकृत दुजोरा कोणत्याही इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला नाही. जेथे अधिकारी संभाव्य चर्चेसाठी गेल्या काही दिवसांपासून सज्ज आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे चर्चेसाठी अमेरिकन संघाचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा आहे. इराणने आपल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करेल याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. गेल्या वेळी, परराष्ट्रीय मंत्री अब्बास अरागची व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी इराणी बाजूचे नेतृत्व केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment