होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

इंस्टग्रामवर जुळले प्रेमाचे सूत अन् परदेशी तरुणी थेट जळगावात पोलिसांच्या बेडीत! पुढे काय झाले ‘ते’ जाणून घ्या!

On: May 11, 2026 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर प्रेमात पडलेली एक २० वर्षीय बांगलादेशी युवती कायदेशीररीत्या सीमा ओलांडून जळगावात दाखल झाली. मात्र, जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी या तरुणीचा शोध घेत तिला अटक केली असून, तिला आश्रय देणाऱ्या युवकावरही गुन्हा दाखल केला आहे. बांग्लादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर घुसखोरीचे प्रकार गाजत असतानाच असेच एक ताजे प्रकरण पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाले आहे. युवतीचा खरा उद्देश काय? प्रेम प्रकरण की आणखी काही याचा पोलीस छडा लावत आहे.

पोलिसांनी अशी केली कारवाई

मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील जोशी पेठ भागात एक बांग्लादेशी महिला बेकायदेशीर रित्या राहत असल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची शहानिशा केली तेव्हा पोलिसांचा संशय आणखी बळावला, पोलिसांनी संशयास्पद ठिकाणी छापा टाकला टाकल्यावर कोणीका राणी शामलचंद्र राय (२०) ही बांगलादेशी तरुणी असल्याचे निष्पन्न झाले. अधिक पोलीस तपास केल्यावर तिच्याजवळ वैध पासपोर्ट किंवा व्हिसा मिळाला नाही.

प्रेमासाठी थेट भारतात दाखल झालेली ही तरुणी जळगावमध्ये आल्याचे कळल्यावर अधिक चौकशीत ती सोने कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला याच्या प्रेमापोटी तिने एवढे मोठे पाऊल उचलले. चिन्मय आणि कोणीका राणी यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली, या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. चिन्मयच्या प्रेमापोटी आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी कोणीका हिने थेट कोणतीही पर्वा न करता बेकायदेशीररित्या बांगलादेशची सीमा ओलांडत भारतात प्रवेश केला.

दरम्यान पोलिसांनी खोलवर तपास सुरू केल्यावर कोणीका आणि चिन्मय या दोघांनीही आम्ही लग्न केले असल्याचे सांगितले. पण त्यांच्याकडे लग्नाचा कोणताच पुरावा सापडला नाही. कोणताही कायदेशीर पुरावा किंवा अधिकृत कागदपत्रे आढळून आलेली नसल्याने बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या कोणीका राणीला पोलिसांनी अटक केली, तसेच चिन्मयवर देखील तिला बेकायदेशीर आश्रय दिला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी इमिग्रेशन कायदा आणि परदेशी नागरिक कायदा २०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी करत आहेत. एकीकडे बेकायदेशीर बांग्लादेशी नागरिकांचं मुद्दा गाजत असतांना पुन्हा एक प्रकरण समोर आल्याने पोलीस कसून चौकशी करत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment