होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

‘एआय’ अंगणवाडी’ बघितली का? कुठे आहे ते जाणून घ्या! विधिमंडळ महिला बाल कल्याण समितीकडून दखल

On: May 16, 2026 2:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: महाराष्ट्र विधिमंडळाच्या महिला व बाल हक्क आणि कल्याण समितीने नाशिक जिल्हा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान समितीने दिंडोरी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये व संस्थांना भेट देत कामकाजाची पाहणी केली. समितीने दिंडोरी तालुक्यातील आदिवासी मुलींचे वस्तीगृह, तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, वनारवाडी येथील आदर्श (AI) अंगणवाडी केंद्र, सह्याद्री फार्म येथे भेट देऊन समितीने शेतकाऱ्यांविषयी राबवल्या जाणाऱ्या प्रशिक्षणांची माहिती घेतली, पंचायत समिती दिंडोरी, पोलीस स्टेशन दिंडोरी तसेच आदर्श ग्रामपंचायत अवनखेड येथे भेट देऊन सरपंच व ग्रामस्थांशी संवाद साधला व विविध उपक्रमांची माहिती घेतली.

या भेटीदरम्यान वनारवाडी येथील आदर्श AI अंगणवाडी केंद्र विशेष आकर्षणाचा विषय ठरले. ग्रामीण भागातील बालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण पूर्व शिक्षण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या अंगणवाडी केंद्राची समिती सदस्यांनी सविस्तर पाहणी केली. या केंद्रामध्ये बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी डिजिटल शिक्षण साहित्य, आकर्षक वर्गरचना, खेळातून शिक्षण पद्धती तसेच बालमैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

समितीच्या उपस्थितीत अंगणवाडी केंद्रामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाचा अन्नसेवन सोहळा, तीन वर्षे पूर्ण झालेल्या बालकांचा अंगणवाडी प्रवेश उत्सव तसेच गर्भवती मातांचा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समिती अध्यक्षा आमदार मोनिका राजळे, समिती सदस्य आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार मंजुळा गावित तसेच आमदार सीमा हिरे यांच्या शुभहस्ते हे कार्यक्रम झाले.

समिती सदस्यांनी आदर्श AI अंगणवाडी केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या आधुनिक व आकर्षक अंगणवाड्या निर्माण झाल्यास बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन अंगणवाडीतील उपस्थिती वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बाल विकास विभागाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

आदर्श AI अंगणवाडी केंद्राबाबतची सविस्तर माहिती दिंडोरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार व कंत्राटदार अश्विन पाटील यांनी समितीसमोर सादर केली. या दौऱ्यादरम्यान विधिमंडळाचे अवर सचिव सीमा तांबे, कक्षा अधिकारी मनीषा मॅडम तसेच कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी समितीसोबत उपस्थित राहून विविध योजनांची माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment