Cockroach Janata Party: देशात तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या सीजेपीने सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. ६ जुना रोजी दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पार्टीचे बेरोजगारी आणि नीट पेपरलीक तसेच मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या मुद्द्यांवर आंदोलन पुकारले आहे. त्यासाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेहून भारतासाठी रवाना झाले आहेत. भारतासाठी निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असून, “मी भारतासाठी निघालो आहे. मी माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, जय भीम!” असे त्यांनी नमूद केले आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार
पेपरलीक प्रकरणावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळे आहे. अभिजीत दीपके शनिवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील त्यानंतर ते थेट पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाणार असून जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी अधिकृत परवानगीची मागणी करतील, दिल्ली पोलिसांनी अद्याप या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. ‘नीट’ पेपर लीक प्रकरण आणि सीबीएसई परीक्षा निकालांमधील अनियिमितते विरोधात आंदोलन केले जाणार असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी सीजेपी पक्षाने केली आहे.
४० हजार व्हॉलेंटियर नोंदणी
६ जून रोजी कॉकरोच जनता पार्टीचे सुमारे १० लाखावर सदस्य नोंदणी झाली आहे, या आदोलनासाठी मोठ्या प्रमाणात समर्थक येण्याची शक्यता असल्याने गर्दीचे नियंत्रण कारण्यासह शांतता आणि शिस्तीने आंदोलन व्हावे यासाठी आंदोलनाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरणार आहे, त्याअनुषंगाने सीजेपीने ४० हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाल्याचे एका वाहिनीशी बोलतांना सांगितले आहे.
दरम्यान कॉकरोच जनता पार्टीला मोठा प्रतिसाद मिळत आहे, सामाजिक कार्यकतें सोनम वागचुंग यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या आंदोलनात सहभागी होणार आहे. तत्पूवी भारतात आल्यानंतर येणाऱ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास देखील दिपके यांनी केला असून त्यासाठी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्याशी संपर्क केल्याचे ही एका वृत्त वाहिनीने वृत्त दिले होते.
उच्च न्यायालयाचा ‘सीजेपी’ला दिलासा
उच्च न्यायालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ला दिलासा दिला असून आंदोलनाविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी, ६ जून रोजी जंतर मंतर येथे नियोजित आंदोलनाविरोधात कायदा आणि सुव्यवस्थतेचा प्रश्न उपस्थित करून डिजिटल संघटना ‘कॉकरोच जनता पार्टी’ विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी नाकारली आहे, त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीला दिलासा मिळाला आहे.









