होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वरणगावला बससेवेचा ‘बायपास’; प्रवाशांचा संताप, आगार प्रमुखांकडे शिवसेना महिलांची धाव

On: July 4, 2026 8:01 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News: जळगाव आगाराच्या बसेस मार्गावरील अधिकृत बसथांब्यांवर न थांबवता तसेच वरणगाव शहराला बायपास करून थेट पुढे जात असल्याने हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन बससेवा नियमित करण्याची मागणी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महिला आघाडी प्रमुख रेखा देशमुख यांनी जळगाव आगार प्रमुखांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक बसेस आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अंजिठा चौफुली आणि कालिका माता चौक या अधिकृत बसथांब्यांवर थांबत नाहीत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवासी हात दाखवूनही चालक बस न थांबवता वेगाने पुढे घेऊन जात असल्याने प्रवाशांना तासंतास दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे अनेक सुपरफास्ट आणि इतर बसेस वरणगाव शहरात न येता थेट बायपास मार्गाने जात आहेत. त्यामुळे वरणगावसह परिसरातील सुमारे ७२ लहान-मोठ्या गावांतील नागरिकांना जळगाव व भुसावळ येथे ये-जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बस शहरात न आल्यामुळे अनेकांना अतिरिक्त खर्च करून भुसावळ बसस्थानक गाठावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान मुक्ताईनगर व बोदवड येथून येणाऱ्या काही बसेसही अधिकृत बसथांब्यांवर न थांबता दूर अंतरावर थांबत असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांची मोठी गैरसोय होत आहे.

या सर्व प्रकाराची जळगाव आगार प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व बसेस अधिकृत बसथांब्यांवर थांबविणे, महिला प्रवाशांनी हात दिल्यास बस थांबविण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करणे तसेच वरणगाव शहराला बायपास न करता शहरातूनच बससेवा सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी रेखा देशमुख यांनी केली आहे. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सविता माळी तसेच शिवसेना भुसावळ तालुका प्रमुख यांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment