Jalgaon News: जळगाव तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत हददीत दूषित पाण्याची समस्या गंभीर बनली असून ती तत्काळ सोडवावावी, अन्यथा तेच पाणी जबाबदार अधिकाऱ्यांना पाजणार, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनाचा आशय असा
दरम्यान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, जळगाव तालुक्यातील मौजे भोकर ग्रामपंचायत हद्दीत होणाऱ्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्या बाबत वारंवार सूचना देऊनही फरक पडत नाही. आम्ही भोकर येथील रहिवासी, या निवेदनाद्वारे, आपले लक्ष एका गंभीर समस्येकडे वेधू इच्छितो. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या भागात अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामपंचायत हद्दीत संपूर्ण गावाला दूषित पाणी पुरवठा होत असल्यास ही अतिशय गंभीर बाब आहे, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्याशी येतो. या समस्येचे लवकरात लवकर निवारण होणे गरजेचे आहे.
मागील तीन ते चार महिन्यापासून पाणी दूषित येत आहे. प्रभावित परिसर:ग्रामपंचायतीच्या प्लॉट एरिया जुना व नवीन,कोळी वाडा,गुजर वाडा,बडगुजर वाडा,चांभार वाडा,दर्जाचा वाडा,कुणबी वाडा,डेबुर वाडा,मांग वाडा,हरिहर महाराज मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत आहे.

आरोग्याचा धोका
*दूषित पाण्यामुळे गावात उलट्या,जुलाब,गॅस्ट्रो,टायफॉइड किंवा काविळी सारखे आजार पसरत आहेत.नागरिकांच्या विशेषतः लहान मुले आणि वृद्ध आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
*पाण्याच्या टाकीची बऱ्याच दिवसांत स्वच्छता न होणे.
*मुख्य जलवाहिनी कुठे फुटली असणे किंवा गटाराचे पाणी त्यात मिसळत असणे.
*पाण्यावर योग्य ती शुद्धीकरण प्रक्रिया टीसीएल/ब्लिचिंग पावडर टाकणे न करणे.
*वैकल्पिक व्यवस्था: जोपर्यंत शुद्ध पाणी पुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत प्रशासनाने टँकरद्वारे किंवा इतर माध्यमांतून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय करावी.
*समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील २४ ते ४८ तासांत योग्य कारवाई करावी,अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन किंवा कायदेशीर पावले उचलली जातील.
तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव अशी मागणी केले आहे. याप्रसंगी प्रा. भाऊसाहेब सोनवणे, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, एकनाथ सैंदाने, कविता सोनु बाविस्कर, चंद्रभागा कोळी, समाधान सपकाळे, धनराज वारडे, सुकदेव बाविस्कर सह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..








