Jalgaon News: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे दादी प्रकाशमणीजी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ “१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महासंकल्प अभियान” राबविण्यात येणार आहे. ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण देशभर हे विशेष अभियान आयोजित करण्यात येत असून, विकसित, निरोगी आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
व्यसनामुळे आरोग्यावर गंभीर
व्यसनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, कौटुंबिक तणाव वाढतो, आर्थिक नुकसान होते आणि युवकांचे भविष्य धोक्यात येते. या पार्श्वभूमीवर राजयोग ध्यान ही आत्मनियंत्रण, मानसिक स्थैर्य आणि दृढ इच्छाशक्ती निर्माण करणारी प्रभावी जीवनशैली असल्याचे माऊंट आबू मेडिकल प्रभागाचे डॉ. बनारसी शहा यांनी केले आहे.
विविध संस्थांचा सहभाग
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्रातील सेवाकेंद्र एकवटेल असून राज्यातील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रातून विविध प्रकारच्या संस्था, महाविद्यालये, शाळा, विविध माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती होणार असल्याची माहिती ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाचे राज्य माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी दिली.

व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा
अभियानात प्रत्येक नागरिकाने ऑनलाइन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करावी तसेच किमान ५० नागरिकांपर्यंत हा संकल्प पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राजयोग ध्यानाचा नियमित सराव, सकारात्मक विचार, आत्मसंवाद, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सत्संग यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जनआंदोलनात सहभागी व्हावे
ब्रह्माकुमारीज मेडिकल विंगने सर्व शैक्षणिक संस्था, उद्योग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे तसेच सर्व नागरिकांना या राष्ट्रीय जनआंदोलनात सहभागी होऊन व्यसनमुक्त, निरोगी, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन स्थानिक सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी दीदी यांनी केले आहे.









