होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

हवामान स्थिती: राज्यातील ‘या’ १० जिल्ह्यात ४ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस

On: August 3, 2026 7:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: राज्यातील या जिल्ह्यात उद्या ४ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे, त्यामध्ये या १० जिल्ह्याना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाट परिसरासह भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उद्या कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान आज ३ ऑगस्ट रोजी १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. तसेच रायगड आणि पुणे-सातारा घाट परिसराला ऑरेंज अलर्ट असून येथे अतिमुसळधार पावसाचा अंदाज होता . कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत पावसाची सरासरी कमी राहणार आहे. मात्र, केवळ ऑगस्ट महिन्याचा विचार केल्यास मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचा काही भाग वगळता मराठवाड्यात पाऊस चांगला राहील. दुसरीकडे, जून आणि जुलैमध्ये चांगला पाऊस झालेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

कुस्तीपटू अश्विनी पोळ आत्महत्येनंतर तिच्या वडिलांचा मोठा खुलासा

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

Leave a Comment