होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Pune Accident News: दुर्दैवी! दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा मृत्यू

On: September 5, 2026 1:19 PM
Follow Us:
---Advertisement---

Pune Accident News: सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरु असताना पुण्यातील जुन्या सांगवी भागातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) डोक्यावर पडल्याने सलमा सलाउद्दीन पठाण या 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास जेव्हा मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा खाली उतरवत होते, तेव्हा हा अपघात घडला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या यांचा जागीच मृत्यू झाला.

 

विशेष म्हणजे, मृत सलमा यांचा मुलगा स्वतः याच दहीहंडी मंडळात सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे, ज्यामुळे या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाचा या मंडळात सहभाग असल्याच्या कारणास्तव पठाण कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसात कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला आहे. तरीही, या गंभीर आणि अपघाती घटनेची दखल घेत पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती कुटुंबीयांना केली असून, या दुर्दैवी घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

 

नेमकं काय घडलं?

 

जन्माष्टमीनिमित्त पुण्यातील जुन्या सांगवी भागात दहीहंडीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) काढताना अपधात झाला. दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास जेव्हा मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा खाली उतरवत होते, तेव्हा त्याचा एक अवजड भाग अचानक खाली उभारलेल्या सलमा यांच्या थेट डोक्यात पडला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

कुस्तीपटू अश्विनी पोळ आत्महत्येनंतर तिच्या वडिलांचा मोठा खुलासा

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

Leave a Comment