होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मोठी बातमी: इराणचे बहरीन आणि कुवेतवर हल्ले; अमेरिकन क्षेपणास्त्र विरोधी संरक्षक ‘हिमार्स’ लाँचर्स नष्ट केल्याचा दावा

On: July 13, 2026 12:34 PM
Follow Us:
---Advertisement---

America and Iran Conflict: अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी भडकली आहे. इराणने देखील हल्ले सुरू केले आहे. इराणच्या ‘आयआरजीसी’ ने म्हटले की, कुवेतमध्ये अमेरिकेच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या तळाला लक्ष्य करण्यात आले; यात “दोन ‘हायमार्स’ (HIMARS) क्षेपणास्त्र लाँचर्स (Anti Missile Defence Systems) आणि क्षेपणास्त्रांनी भरलेली गोदामे यांना आग लावून ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली. असा दावा ‘आयआरजीसी’ने केला आहे. ते म्हणाले की, आज सकाळी त्यांच्या प्रत्युत्तराच्या कारवाईच्या चौथ्या टप्प्यात कुवेतवर हे हल्ले करण्यात आले.

ओमानमधील रडार नष्ट केल्याचाही दावा

‘आयआरजीसीने’ (IRGC) इशारा दिला की, “हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) जहाजांच्या वाहतुकीसाठी खुली करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या भागात अमेरिकन सैन्याचा हस्तक्षेप थांबवणे आणि देशांच्या त्यांच्या स्वतःच्या किनारपट्टीवरील जलक्षेत्रावरील सार्वभौमत्वाचा आदर करणे हा आहे. हा हस्तक्षेप सुरू राहिल्यास जागतिक तेल आणि वायू क्षेत्रात अधिक गंभीर घटना घडू शकतात, असे नमूद केले आहे.

त्यांनी सांगितले की, बहरीनमधील जुफैर (Juffair) येथील “आक्रमक अमेरिकन सैन्याच्या आस्थापना आणि पायाभूत सुविधा” तसेच ओमानमधील “एफपीएस (FPS) लांब पल्ल्याचे हवाई रडार आणि जहाज शोधणारे रडार” यांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले करण्यात आले. ‘आयआरजीसी’चे म्हटले की, आज सकाळी त्यांच्या प्रत्युत्तराच्या कारवाईच्या चौथ्या टप्प्यात कुवेतवर हल्ले करण्यात आले. क्षेपणास्त्र लाँचर्स आणि क्षेपणास्त्रांनी भरलेली गोदामे यांना आग लावून ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली, असे वृत्त अल जंजिरानेही दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

विरोधीपक्ष नेते खा. राहुल गांधी यांचा पंतप्रधानच्या निवासस्थानावर मोर्चा; रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची ही घेतली भेट

नीट पेपरफुटी प्रकरण: पंतप्रधानाचे महत्त्वाचे विधान; काय म्हणाले ते जाणून घ्या

लाठीचार्जनंतर: सोनम वांगचुक आपले उपोषण सुरूच ठेवणार; आंदोलनाचा आज निर्णायक दिवस, जंतर-मंतरवर सुरक्षेत वाढ

सीजेपी आंदोलनाने सरकार नरमले, मंत्री जे पी नड्डा नेतृत्वाशी चर्चा करणार; ‘या’ आहेत सीजेपीच्या मागणी

सीजेपीचा दावा, अभिजित दीपके पोलिसांच्या ताब्यात;..तर पोलीस म्हणाले, दिपके ताब्यात नाही! दीपकेंनी उपोषण सोडले

आंदोलक संसद भवनावर धडकले: वांगचुक म्हणाले, मला संसदेतील मोर्चात सहभागी व्हायचंय; सौरभ दास आणि आशुतोष यांची जेपी नड्डा यांच्याशी भेट

Leave a Comment