होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

‘एसआरए’मधील कथित गैरप्रकार प्रकरण: दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

On: September 6, 2026 2:03 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: एसआरएमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कारवाई करण्यात आली असून उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेद्र कल्याणकर यांनी नागरिकांना बेघर करून बिल्डरांची बाजू घेणाऱ्या दोन वरिष्ठ एसआरए अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये, खा. रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत, शिवसेना विभाग अल्ताफ पेवेकर यांच्या पाठपुराव्याने (एसआरए) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना ओशिवरा-जोगेश्वरी परिसरातील गुलशन नगर येथील अल्पसंख्यांक नागरिकांना बेघर करून बिल्डरांची बाजू घेणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याच निर्देश दिले आहेत.

दरम्यान याप्रकरणी अल्ताफ पेवेकर यांनी सातत्याने हा मुद्दा शासनदरबारी उपस्थित केला होता. त्याकडे संबंधित अधिकारी नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून बिल्डरधार्जिण्या भूमिका घेत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे अनेक कुटुंबे बेघर होण्याआपसून वाचली. याबाबत वारंवार तक्रारी करूनही या अधिकाऱ्यांकडून योग्य ती कार्यवाही केली जात नसल्याचे देखील समोर आले होते.

याबाबत खा.रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कठोर भूमिका घेत, ‘एसआरए’चे सीईओ महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित दोन अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment