होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मध्य प्रदेशात खळबळ: विषारी दारू सेवन केल्याने नऊ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री मोहन यादव यांचे कडक कारवाईचे आदेश; विरोधक आक्रमक

On: September 6, 2026 12:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Madhy Pradesh News: सागर शहरात विषारी दारू घोटाळा समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बांदा तालुक्यात विषारी दारूच्या संशयास्पद सेवनामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, इतर अनेकांवर उपचार सुरू आहेत. सरकारने दोषींवर कडक कारवाईची घोषणा केली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

घटना काय

सागर जिल्ह्यातील बांदा तालुक्यात घुघरा, जालमपूर आणि बारज या गावांसह आसपासच्या गावांमध्ये विषारी दारूच्या संशयास्पद सेवनामुळे घबराट पसरली आहे. विषारी दारू प्यायल्यानंतर अनेक गावकऱ्यांची प्रकृती अचानक खालावली, त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते, परिस्थितीचे गांभीर्य पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

माजी आमदार तरवर सिंग लोधी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, अधिकृत दारू विक्रेते उघडपणे ही विषारी दारू विकत आहेत आणि हे सर्व स्थानिक प्रशासनाच्या नाकासमोर घडत आहे. लोधी यांनी आरोप केला आहे की, जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एवढा मोठा अवैध व्यापार फोफावत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा खडा सवाल

दरम्यान सागरमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “मी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही शक्य तितकी कठोर कारवाई करून चौकशी करू. अशा घटनांबाबत आमच्या सरकारची भूमिका शून्य सहनशीलतेची असेल.” या घटनेनंतर काँग्रेसने टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे ते म्हणाले, “सागर जिल्ह्यात विषारी दारूचा धुमाकूळ पुन्हा सुरू झाल्याचे वृत्त येत आहे. प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील बांदा ब्लॉकमधील घुघर, नौरज, बराज आणि आसपासच्या गावांमध्ये विषारी दारू प्यायल्याने संशयास्पद परिस्थिती असून त्या अनेकांचा मृत्यू झाला आहे.

दारूच्या व्यापाराला कोणाचा आश्रय?

पटवारी पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय, मी यापूर्वी सागर जिल्ह्यातील विषारी दारूच्या व्यापाराला सरकारच्या आश्रयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझा पुन्हा एक थेट प्रश्न आहे: विषारी दारूचा व्यापार कोणाच्या संरक्षणाखाली आहे? दारू माफिया इतके निर्भय का आहेत? गरिबांच्या मृत्यूनंतरच सरकारला जाग का येते? या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.” जबाबदार व्यक्ती आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ आणि योग्य आर्थिक मदत मिळाली पाहिजे. संपूर्ण परिसरातील अवैध दारूच्या नेटवर्कवर निर्णायक कारवाई झाली पाहिजे.”

उपमुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी सागरमधील मृत्यूवर दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर लिहिले, “सागर जिल्ह्यातील बांदा शाहगड परिसरात दारूच्या सेवनामुळे काही लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून सविस्तर माहिती मागवली आहे. उत्पादन शुल्क आयुक्त घटनास्थळी येत आहेत. या घटनेसाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. सरकार या प्रकरणात शक्य तितकी कठोर कारवाई सुनिश्चित करेल.” माझी तीव्र शोकसंवेदना पीडित लोकांप्रति आहे.”

पोलीस महानिरीक्षक घटनास्थळी

नौरज आणि गुगरा खुर्द या गावांमध्ये अवैध विषारी दारूच्या सेवनाने झालेल्या मृत्यूंनंतर, सागरचे आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी उपस्थित आहेत. अधिकाऱ्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचार व्यवस्थेची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, परिसरातील सहा दारूची दुकाने सील करण्यात आली असून तातडीने नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, ज्यांनी दारूचे सेवन केले आहे आणि ज्यांना उलट्या, डोकेदुखी किंवा ताप यांसारखी लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी.

रुग्णांना जिल्हा रुग्णालयात केले दाखल

विषारी दारू प्यायल्यानंतर आजारी पडलेल्या लोकांना तातडीच्या उपचारासाठी बांदा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बांदा येथे प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी सागर जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Jammu Kashmir Operation Ashdar: सुरक्षादलांना मोठे यश; लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी यासिर ठार

बागडिही-झारसुगुडा चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस गाडी रद्द

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

Leave a Comment