होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Latest Weather News: पुढील ‘हे’ तीन दिवस जळगावचे हवामान राहणार कोरडे; मध्य महाराष्टात कशी असेल स्थिती ‘ते’ जाणून घ्या!

On: September 7, 2026 1:04 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: जळगावमध्ये पावसाने दडी मारली आहे. वातावरणात उष्मा जाणवत आहे. सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याने ऐन श्रावणात नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. ढग भरून येतात मात्र, पाऊस न पडताच ढग पुढे सरत आहेत. वातावरणातील हा बदल म्हणजे अल निनोचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांना वाटते. गेल्या दोन दिवसापासून उष्णता वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. आज आणि उद्या जळगावात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, एक-दोन वेळा मेघगर्जनेसह पावसाच्या सरीं बरसण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र उकाडा कायम आहे.

जळगावचे हवामान

दरम्यान जळगावला ९ ते ११ सप्टेंबर पुढील तीन दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता कुलाबा हवामान केंद्राने वर्तविली आहे. सध्या जळगावचे कमाल तापमान हे ३३.० अंश सेल्सियस इतके आहे. उद्या देखील कमाल तापमान ३२ अंश सेल्सियस राहील, असा अनुमान आहे. तूर्तास तरी उकाड्यापासून जळगावकरांची सुटका नाही, असे चित्र दिसत आहे.

मध्य महाराष्ट्र पडलेला (सें.मी.) पाऊस

मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ४.३, महाबळेश्वर ३.१, त्र्यंबकेश्वर, लोणावळा कृषी १.७ प्रत्येकी, चांदवड १.६, ओझरखेडा एफएमओ, इगतपुरी १.५ प्रत्येकी, राधानगरी, हरसूल एफएमओ १.१ प्रत्येकी, नाशिक आयएमडी वेधशाळा ०.७, वणी-एआरजी, वडगाव मावळ ०.६ प्रत्येकी, चिंचवड एआरजी, लोहगाव आय.ए.एफ, तळेगाव ए.डब्लल्यू.एस. ०.५ प्रत्येकी सेंटीमीटर पाऊस झाला आहे.जळगाव निरंक आहे. ७ व ९ सप्टेंबरला हलक्या सरी कोसळतील मात्र मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा इशारा नाहीये. त्यानंतर ९ ते ११ सप्टेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.

कोकणाला पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने ६ ते १२ सप्टेंबर दरम्यान गुजरात प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मात्र हवामान विभागाने कुठालाच इशारा दिलेला नाही. तसेच ६ ते १२ सप्टेंबर दरम्यान कोकण आणि गोव्याच्या मोठ्या भागात किंवा जवळपास संपूर्ण भागात पावसाची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

कंडारी गावाजवळ मुख्य जलवाहिनीला गळती, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, आजचा पाणीपुरवठा उद्या 8 सप्टेंबरला होणार! एक दिवस उशिराने पुरवठा नियोजन

..अखेर आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून नाशिकच्या रस्त्यांची पाहणी; कोअर कटद्वारे काँक्रिटची तपासणी

शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी समृद्धी रेल्वेच्या शंभर फेऱ्या पूर्ण; रेल्वेला ६ कोटींचा महसूल प्राप्त

उत्सुकता शिगेला ! शिवतीर्थावर आज युवतींची दहीहंडी, ६८५ युवतींचा सहभाग

फेसर्डी गावासाठी स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान द्या; मनसेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

रेशनींग दुकानदारांचे ७ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन; ‘e-POS’ मशीनच्या तांत्रिक आडचणींविरोधात एक दिवस वितरण बंद

Leave a Comment