होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कंडारी गावाजवळ मुख्य जलवाहिनीला गळती, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, आजचा पाणीपुरवठा उद्या 8 सप्टेंबरला होणार! एक दिवस उशिराने पुरवठा नियोजन

On: September 7, 2026 8:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: शहराला पाणीपुरवठा करणारी वाघुर ते उमाळा 1168 मीमीच्या मुख्य जलवाहिनीला कंडारी गावाजवळ मोठ्याप्रमाणात गळती लागल्याने जळगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकल्यात येत असून. दि. 7 सप्टेंबर रोजीचा पाणी पुरवठा हा दि.8 सप्टेंबर रोजी करण्यात येईल व दि. 8 व 9 सप्टेंबर रोजीचा नियोजित भागांचा पाणी पुरवठा एक दिवस उशिराने होईल. नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी केले आहे.

कंडारी गावाजवळील गळतीने आज दि.7 सप्टेंबर रोजी सकाळी काही भागात अल्प वेळ पाणी आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली असून गळती रोखली आहे. या पाणी गळतीमुळे आजचा पाणीपुरवठा काही भागात होऊ शकला नसल्याने पाणीपुरवठा विभागातर्फ एक दिवसाआड उशीराने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

7 सप्टेंबरचा पाणीपुरवठा उद्या 8 रोजी खालील भागात केला जाईल

वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर. नित्यांनदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरुनगर परिसर खंडेरावनगर परिसर – हरीविठ्ठल नगर, पिंप्राळा गांवठाण परिसर, गायत्रीनगर, नुतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी. मानराज टाकीवरील भाग दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी. खोटेनगर टाकीवरील भाग द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर. गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस. एम.आय.टी. परिसर. डायरेक्ट – योगेश्वर नगर, हिरा पाईप व शंकरराव नगर व खेडीगांव परिसर. डी.एस.पी. टाकी – तांबापुरा, गणपती नगर, आदर्शनगर व इतर परिसर.शिवकॉलनी, विदयुत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग. अयोध्यानगर पहिला दिवस- गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौ. सोसा. जगवानीनगर, मेहरुण पहिला दिवस- सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर,

8 सप्टेंबरचा नियोजित पाणी पुरवठा 9 सप्टेंबर रोजी होणार.

खंडेरावनगर दुसरा दिवस पिंप्राळा गांवठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बैंक कॉलनी, आशाबाबा नगर पिंप्राळा टाकी मानराज टाकी दुसरा दिवस शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग. नित्यानंद टाकी दुसरा दिवस नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनी नगर, समतानगर परिसरातील उर्वरीत भाग.डी.एस.पी. बायपास – तांबापुरा, शामाफायर समोरील परिसर. डी.एस.पी. टाकीवरुन- जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नुतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी,आनंदनगर, तिवारी नगर, बाहेती शाळा इ. गिरणाटाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हे नगर, अंबि का सोसायटी, शिवकॉलनी, व इतर परिसर. मेहरुण भागातील राहिलेला परिसर (बुस्टर पंप स. 4 वा. सुरु) मेहरुण गांवठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर. अयोध्यानगर दुसरा दिवस- सदगुरुनगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर

9 सप्टेंबरचा नियोजित पाणी पुरवठा दि.10 सप्टेंबर रोजी होईल.

नटराज टाकी ते चौघुले मळा पर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीरामपेठ, नविपेठ, हौसिंग सोसा., शाहुनगर, प्रतापनगर.गेंदालाल मिल टाकीवरील भाग खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको.रिंगरोड संपूर्ण – भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर,आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ.हेमुकलाणी टाकीवरील परिसर गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर.

डायरेक्ट – सुप्रिम कॉलनी परिसर. डी. एस. पी. टाकी – सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंत नगर परिसरातील उर्वरीत भाग, श्रध्दा कॉलनी, नंदनवन नगर, चर्चरोड 15 इंची व्हॉल – प्रभात कॉलनी, ब्रुकबॉन्ड कॉलनी, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी वाघनगर, हरिविठ्ठल नगर.गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग नित्यानंद टाकी- समता नगर, स्टेट बैंक कॉलनी, धांडेनगर इत्यादी.मेहरुण ईकबाल कॉलनी, मिल्लत नगर, पाण्याच्या टाकीचा परिसर आदी भागात होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

..अखेर आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून नाशिकच्या रस्त्यांची पाहणी; कोअर कटद्वारे काँक्रिटची तपासणी

Latest Weather News: पुढील ‘हे’ तीन दिवस जळगावचे हवामान राहणार कोरडे; मध्य महाराष्टात कशी असेल स्थिती ‘ते’ जाणून घ्या!

शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी समृद्धी रेल्वेच्या शंभर फेऱ्या पूर्ण; रेल्वेला ६ कोटींचा महसूल प्राप्त

उत्सुकता शिगेला ! शिवतीर्थावर आज युवतींची दहीहंडी, ६८५ युवतींचा सहभाग

फेसर्डी गावासाठी स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान द्या; मनसेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

रेशनींग दुकानदारांचे ७ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन; ‘e-POS’ मशीनच्या तांत्रिक आडचणींविरोधात एक दिवस वितरण बंद

Leave a Comment