होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Maharashtra Rajya Sabha Election: मोठी बातमी! भाजपाकडून राज्यसभेसाठी ‘या’ चार जणांना संधी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?

On: March 4, 2026 12:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभा सदस्य निवडणुकीच्या हलचालींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष आपली मोर्चे बांधणी करत आहे. भाजपानेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अशात भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, महाराष्ट्राचा सस्पेन्स कायम होता. महाराष्ट्रातून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू असताना भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर राज्यसभेचा कार्यकाळ समाप्त होत असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उमेदवारीबाबतचा संभ्रमही दूर झाला असून त्यांना उमेदवारी मिळाली आहे.

भाजपाने मंगळवारी, उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये सहा राज्यांमधील नऊ जणांचा समावेश आहे. यात बिहारमधून भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि शिवेश कुमार यांना उमेदवारी दिली. आसाममध्ये तेराश गोवाला आणि जोगेन मोहन यांना उमेदवारी देण्यात आली. लक्ष्मी वर्मा यांना छत्तीसगडमधून, तर संजय भाटिया यांना हरियाणामधून संधी देण्यात आली. ओडिशामधून मनमोहन सामल आणि सुजीत कुमार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील आणि राहुल सिन्हा हे पश्चिम बंगालमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर महाराष्ट्रातून रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

16 मार्च रोजी मतदान

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या 10 राज्यांमधील 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुका होत आहे. राज्यसभा सदस्यांच्या या निवडीसाठी 16 मार्च रोजी मतदान होईल. निवडणूक आयोगाने याबाबात वेळापत्रक निश्चित केलं आहे. 16 मार्च रोजी मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्चपर्यंत पूर्ण होईल.

तृणमुलकडून चार उमेदवार जाहीर

तृणमूल काँग्रेस (एआयटीसी) ने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. बाबुल सुप्रियो, राजीव कुमार, मेनका गुरुस्वामी आणि कोएल मल्लिक यांचा समावेश आहे. तर बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष नवीन पटनायक यांनी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी डॉ. संतृतुप्त मिश्रा आणि डॉ. दत्तेश्वर होता यांची उमेदवार म्हणून नावे जाहीर केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment