New Delhi: मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आणि ट्राय (TRAI) यांनी दूरसंचार नियमांमध्ये सुधारणा करून ३० दिवसांच्या वैधतेचे नवीन रिचार्ज प्लॅन्स लागू केले आहेत. ग्राहकांना आता वर्षातून १३ ऐवजी फक्त १२ वेळा रिचार्ज करावा लागेल. ज्यांना डेटाची गरज नाही, अशा वापरकर्त्यांना फक्त व्हॉईस आणि एसएमएस असलेले प्लॅन्स देखील मिळणार आहे, अशी माहिती भाजप खासदार राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून दिली.
सरकारने नुकतेच दूरसंचार ग्राहक संरक्षण १३ वी सुधारणा- विनियम, २०२६ लागू केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना आता खालील पर्याय मिळतील. तुम्हाला दर २८ दिवसांनी फोन रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळेल. या नवीन नियमानुसार, दूरसंचार कंपन्यांना आता पूर्ण ३० दिवसांच्या वैधतेचे प्लॅन्स देणे बंधनकारक असणार आहे.
राघव चड्ढा यांनी ‘एक्स’वर काय म्हटले?
दरम्यान भाजप खासदार राघव चड्ढा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आणि आपला आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे, त्यांनी ११ मार्च रोजी संसदेत दूरसंचार कंपन्यांच्या “२८ दिवसांच्या गणिताचा” मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता. आपल्या पोस्टमध्ये, खासदार चड्ढा यांनी भारत सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांचे आभार मानले आणि सांगितले की, ग्राहकांसाठी मर्यादित पर्याय असल्याबद्दल लोकांनी त्यांच्या चिंता त्यांच्याकडे व्यक्त केल्या होत्या. आता, या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे, ग्राहकांना अधिक पर्याय आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होतील.

आता १२ रिचार्ज
दरम्यान राघव चड्ढा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, ग्राहकांना आता वर्षातून १३ ऐवजी फक्त १२ वेळा रिचार्ज करावा लागेल. याव्यतिरिक्त, ज्यांना डेटाची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी व्हॉइस आणि एसएमएस प्लॅनचे पर्याय देखील उपलब्ध असतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमुळे कंपन्या वर्षाला एका अतिरिक्त महिन्याचे शुल्क आकारत असत. ३० दिवसांच्या चक्रामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील अनावश्यक भार कमी होईल.
परवडणारे कॉलिंग प्लॅन्स
नवीन नियमांची अंमलबजावणी करून, सरकारने आणि ट्रायने अशा वापरकर्त्यांची विशेष काळजी घेतली आहे जे क्वचितच रिचार्ज करतात, ज्यांना जास्त इंटरनेट ॲक्सेसची आवश्यकता नसते आणि जे फक्त बेसिक कॉलिंग वापरतात. एअरटेल, जिओ, व्होडाफोन आणि बीएसएनएल सारख्या दूरसंचार कंपन्यांना आता महागडे इंटरनेट डेटा शुल्क नसलेले परवडणारे व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन्स देणे बंधनकारक असेल. यामुळे ज्यांना परवडणाऱ्या मोबाईल सेवांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना मोठा दिलासा मिळेल.
दरम्यान खासदार चड्ढा यांनी भारत सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांचे आभार मानले. मर्यादित ग्राहक पर्यायांविषयी लोकांनी आपल्या चिंता त्यांच्यासमोर मांडल्या होत्या, नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांना अधिक पर्याय आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होतील. असा अपेक्षा त्यांनी आपल्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर व्यक्त केली.











