होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मालवाहतूक अन् लॉजिस्टिक्स सेवेला मिळणार चालना; रेल्वेचा एकलहरेत १४ ला उद्योग संवाद मेळावा

On: October 11, 2026 12:19 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे औद्योगिक संस्था, उत्पादक, व्यापारी, कृषी संस्था, मालवाहतूक ग्राहक आणि लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादारांसाठी रेल्वे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स उद्योग संवाद मेळावा होणार आहे. १४ ऑक्टोबरला सकाळी दहाला एकलहरे येथील रेल्वेच्या इरिन संस्थेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल मेळाव्याचे उदघाटन करणार आहेत.

या मेळाव्याच्या माध्यमातून रेल्वे अधिकारी आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी एकत्र येऊन नाशिक व परिसरातील उद्योगांच्या मालवाहतुकीच्या गरजा रेल्वेमार्फत अधिक प्रभावीपणे कशा पूर्ण करता येतील, यावर चर्चा करतील. विद्यमान तसेच संभाव्य मालवाहतूक ग्राहकांना त्यांच्या लॉजिस्टिक्सविषयक गरजा, कार्यप्रणालीशी संबंधित समस्या मांडण्याची आणि रेल्वे मालवाहतुकीच्या संधींचा शोध घेण्याची ही संधी आहे.

नवीन प्रकारांची, मार्गांची वाहतूक रेल्वेतर्फे करण्याच्या संधी, लॉजिस्टिक्स संपर्कव्यवस्था अधिक मजबूत करणे तसेच मालवाहतूक सुविधा, सेवा आणि लागू असलेल्या धोरणांची माहिती यावर विशेष भर दिला जाणार आहे. नाशिक परिसरात औद्योगिक, कृषी क्षेत्र असल्यामुळे रेल्वे मालवाहतुकीच्या विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

रेल्वे आणि उद्योग क्षेत्र यांच्यात थेट संवाद व अधिक समन्वय साधून या संधींचे परस्पर लाभदायी व्यावसायिक संधींमध्ये रूपांतर करणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. उद्योग, कृषी संस्था, व्यापारी, लॉजिस्टिक्स कंपन्या आदींनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment