Jalgaon News: जिल्हा रूग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत जळगाव यांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव मुक्तांगण हॉल (जुना नेरी नाक्या जवळ), जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन सरफराज सिकंदर तडवी हे सभेचे अध्यक्षत आहे.

तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे हे उपस्थीत राहणार आहे. या सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव तसेच या आर्थीक वर्षात जे सभासद सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक सभासदास रु.१००० रु. मिटीग भत्ता रोख स्वरूपात रक्कम देण्यात येणार आहे.
तरी सर्व सभासदांनी सभेस वेळेवर सभेस उपस्थीत राहावे असे आहवान चेअरमन सरफराज सिकंदर तडवी, सचिव सुरेखा लष्करे व सर्व संचालक मंडळ, शाखा व्यवस्थापक ज्ञानदेव पाटील, लिपीक सुभाष भोळे, चंद्रकात सावंत यांनी केले आहे.








