होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Erandol News: टाकरखेडा गावात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती

On: September 12, 2026 12:58 PM
Follow Us:
---Advertisement---

Erandol News: डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा गावात सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी नागरिकांना सायबर सिक्युरिटीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीबाबत माहिती देण्यात आली. संशयास्पद फोन कॉल्स, मेसेज, लिंक तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याची माहितीही देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमात स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, जय ठाकूर आणि राहुल चोपडे यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले. गावातील नागरिकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment