होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

NO UPI NO PAYMENT:व्यापारी म्हणाले, ‘नो यूपीआय डे’; युपीआयला विरोध नाही पण ‘एमडीआर’चा अतिरिक्त भार नको!

On: October 2, 2026 2:52 PM
Follow Us:
---Advertisement---

NO UPI NO PAYMENT: युपीआय (UPI) व्यवहारांवरील (MDR-Merchant Discount Rate) ‘एमडीआर फी’ संदर्भात व्यापारी वर्गाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने गुरुवारी ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. आज बहुसंख्य व्यापाऱ्यांनी एकजुटता दाखवून एकदिवसीय ‘नो यूपीआय डे’ पाळला.

(UPI) युपीआय हे डिजिटल पेमेंटचे महत्त्वाचे माध्यम असून, महाराष्ट्र चेंबरचा UPI युपीआयच्या वापराला विरोध नाही. मात्र, युपीआय व्यवहारांवरील (MDR) मुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, ही महाराष्ट्र चेंबरची भूमिका असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

UPI पेमेंटऐवजी कॅश पेमेंटचा पर्याय

या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाची सामूहिक भूमिका आणि एकजूट अधोरेखित करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी “NO UPI – NO PAYMENT” मोहीम राबविण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. या दिवशी व्यापारी बांधवांनी UPI पेमेंटऐवजी कॅश पेमेंटचा पर्याय स्वीकारून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. ही मोहीम कोणत्याही डिजिटल पेमेंट प्रणालीच्या विरोधात नसून, MDR चा अतिरिक्त आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडू नये, या मागणीसाठीची सामूहिक भूमिका असल्याचे महाराष्ट्र चेंबरने स्पष्ट केले.

सोशल माध्यमातून मोहीम

व्यापारी बांधवांनी शुक्रवारी आज आपल्या व्हाट्सअप डीपी, फेसबुक, इंस्टाग्राम स्टोरी-स्टेटस आदी सोशल माध्यमांवर (NO UPI – NO PAYMENT-ZERO MDR) हा संदेश ठेवून या मोहिमेला पाठिंबा द्यावा, तसेच “एक दिवस, एक भूमिका, एकजूट – ‘नो युपीआय नो पेमेंट’ (NO UPI – NO PAYMENT) या माध्यमातून व्यापाऱ्यांची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात येणार असून, राज्यातील व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबरच्या वतीने करण्यात आले. त्यानुसार आवाहनाला प्रतिसाद देत या मोहिमेत व्यापारी सहभागी झाले.

या बैठकीस महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष संतोष राणे, राज्य मुख्य समन्वयक वेदांशु पाटील ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, विजय जयस्वाल, विनायक शेटे, तसेच संदीप धुरत, विजय केनवडेकर, सुधीर डागा, अजित कोठारी, दीपक भोगले, ओमप्रकाश अगरवाल, संतोष कावळे,अशोक शेटे, मुकेश पारेख, योगेश हुकरे, आशिष परब, दिपा राऊत, धनंजय दुग्गे, प्रशांत शिंदे, आनंद माने आदींनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीचे आभार सचिन शाह यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment