होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Simhastha Kumbh Mela 2027: निफाड-कसबे सुकेणे- खेरवाडी-ओढा भागात रेल्वेची कामे पूर्ण; कार्यक्षम रेल्वे वाहतूक संचालनास होणार मदत

On: October 2, 2026 12:16 PM
Follow Us:
---Advertisement---

Simhastha Kumbh Mela: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. कुंभाच्या तयारी अंतर्गत रेल्वेच्या भुसावळ विभागाने महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. निफाड–कसबे सुकेणे–खेरवाडी–ओढा या १९.९ किलोमीटरच्या विभागात ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली. कसबे सुकेणे व खेरवाडी स्थानकांवर दोन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, तीन ऑटो हट्स, चार लेव्हल क्रॉसिंग तसेच संबंधित यार्ड रिमॉडेलिंग व इंटरलॉकिंगची कामे निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत.

सिंहस्थ कुंभशी संबंधित हे पहिले नॉन-इंटरलॉकिंग काम आहे. या आव्हानात्मक मेगा नॉन-इंटरलॉकिंग कामाच्या यशस्वी अंमलबजावणीत विविध विभाग व यंत्रणांमधील प्रभावी समन्वय आणि अचूक कार्यवाहीचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला.

पूर्ण झालेली प्रमुख कामे

  • निफाड–कसबे सुकेणे–खेरवाडी–ओढा विभागात खालील महत्वाची कामे पूर्ण झाली आहेत.
  • ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणालीची तरतूद करण्यात आली.
  • कसबे सुकेणे येथे ७६ रूटस आणि खेरवाडी येथे ७० रूट्स असलेले कायोसनn मेकचे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यात आले.
  • तीनही ऑटो हट्स येथे सिमेन्स मार्क २ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची तरतूद करण्यात आली. एसआयपी व रोल प्लॅननुसार दहा नवीन ऑटो सिग्नल व वीस सेमी-ऑटो सिग्नल बसविण्यात आले.
  • ऑटोमॅटिक सिग्नलिंगसाठी अप व डाऊन मार्गांवर १०० फ्राशर एमएसडीएसी डीपी बसविण्यात आले.
  • कसबे सुकेणे व खेरवाडी यार्डची पूर्ण ड्युअल डिटेक्शन सुनिश्चित करण्यासाठी १११ सीमेन्स एसीएम-२०० डीप बसविण्यात आले.
  • कम्युनिकेशन व डेटा ट्रान्समिशनसाठी फायबर केबल टाकण्यात आली.
  • आयसीसी तसेच स्थानकावरील एबीएस डिस्प्लेसाठी एफएन-एमयूएक्सचा वापर करण्यात आला.
  • ईएलडी, फ्यूज अलार्म सेफ्टी तसेच आरडीएसओ मान्यताप्राप्त फायर अलार्म प्रणालीद्वारे सुरक्षितता व विश्वसनीयता वाढविण्यात आली.
  • ऑटो हट्स व दोन्ही ईआयची आरडीएसओ टॅननुसार अर्थिंग करण्यात आली.
  • ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणालीच्या तरतुदीसाठी ओढा व निफाड पॅनेल इंटरलॉकिंगमध्ये आवश्यक बदल करण्यात आले.
  • ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणालीच्या तरतुदीसाठी चार लेव्हल क्रॉसिंग गेट्समध्ये आवश्यक बदल करण्यात आले.
  • स्थानके व ऑटो हट्ससह सर्व पाच ईएलएस मध्ये डबल आयपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

हे काम यशस्वीपणे आणि निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यामुळे सिंहस्थ दरम्यान या महत्त्वपूर्ण रेल्वे विभागात सुरक्षित, विश्वसनीय आणि कार्यक्षम रेल्वे वाहतूक संचालन सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.

रेल्वेच्या भुसावळ विभागाने हे आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच विभाग व यंत्रणांचे आभार मानले आहेत. दोन स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, तीन ऑटो हट्स, चार लेव्हल क्रॉसिंग तसेच निफाड व ओढा येथील इंटरलॉकिंगमधील बदलांशी संबंधित या मेगा नॉन-इंटरलॉकिंग कामाची निर्धारित वेळेत यशस्वी अंमलबजावणी ही संपूर्ण टीमच्या समन्वित प्रयत्न, तांत्रिक कौशल्याचे फलित असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment