होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

लातूर जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर दिसताच शेतकऱ्याला अश्रू अनावर

On: September 23, 2026 5:59 PM
Follow Us:
---Advertisement---

CM Latur Visit: मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्रांसह सर्वच मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन पिकांची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री स्वतः राज्यभर दुष्काळी दौरे करत आहे. राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दाैऱ्यावर आहेत. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी फडणवीस बांधावर पोहोचले. मुख्यमंत्र्यांना पाहताच शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला. भावनिक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला आपल्या गळ्याला लावले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा लातूर दौरा

लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळाच्या संबंधाने करावयाच्या आवश्यक त्या उपयोजनांबाबत शासनस्तरावर योग्य कार्यवाही सुरू आहे. तसेच दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनास प्राप्त झालेले आहेत. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत शासन करत आहे. सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभही देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तेवढा ‍निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राज्यातील परिस्थिती गंभीर

दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारे पाणी, जनावरांचा चारा आदी बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. शेतकऱ्यांसोबत शेतीची पाहणी फडणवीस यांच्याकडून केली जात आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे.शेतकरी राजा चिंतेत आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस लातूर जिल्हयातील पिकांची पाहणी करत असताना मुख्यमंत्र्यांना पाहून शेतकऱ्याचा अश्रूचा बांध फुटला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment