Central Railway: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पुणे ते नागपूर, नाशिक ते नागपूर, मुंबई ते नागपूर, नागपुर ते अकोला, नागपूर ते भुसावळ, सोलापूर ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.
विशेष अनारक्षित गाड्या खालील प्रमाणे
1) पुणे-नागपूर विशेष अनारक्षित गाडी (4 फेरी)
01215 विशेष गाडी 19 ऑक्टोंबर 2026 आणि 21 ऑक्टोंबर 2026 रोजी पुणे येथून 14:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 07:30 वाजता नागपूर येथे पोहचेल.
01216 विशेष गाडी 20 ऑक्टोंबर 2026 आणि 22 ऑक्टोंबर 2026 रोजी नागपूर येथून 23:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14:20 वाजता पुणे येथे पोहचेल.

थांबे – दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी.
संरचना-16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह.
2) नाशिकरोड ते नागपूर विशेष अनारक्षित मेमू (4 फेरी)
01217 विशेष गाडी 18 ऑक्टोंबर 2026 आणि 20 ऑक्टोंबर 2026 रोजी नाशिकरोड येथून 16:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05:00 वाजता नागपूर येथे पोहचेल.
01218 विशेष गाडी 19 ऑक्टोंबर 2026 आणि 21 ऑक्टोंबर 2026 रोजी नागपूर येथून 22:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10:20 वाजता नाशिकरोड येथे पोहचेल.
थांबे – मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा (फक्त 01217 साठी) शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी.
संरचना- 12 कार मेमू.
3) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर विशेष अनारक्षित गाडी (4 फेरी)
01019 विशेष गाडी 19 ऑक्टोंबर 2026 आणि 21 ऑक्टोंबर 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 14:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06:10 वाजता नागपूर येथे पोहचेल.
01020 विशेष गाडी 20 ऑक्टोंबर 2026 आणि 22 ऑक्टोंबर 2026 रोजी नागपूर येथून 22:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17:20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.
थांबे – दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी.
संरचना- 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह.
4) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर विशेष अनारक्षित गाडी (2 फेरी)
01219 विशेष गाडी 18 ऑक्टोंबर 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 14:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06:10 वाजता नागपूर येथे पोहचेल.
01220 विशेष गाडी 19 ऑक्टोंबर 2026 रोजी नागपूर येथून 22:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17:20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.
थांबे – दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी.
संरचना- 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह.
5) नागपूर -अकोला विशेष गाडी (4 फेरी)
01131 विशेष गाडी 20 ऑक्टोंबर 2026 आणि 21 ऑक्टोंबर 2026 रोजी नागपूर येथून 18:40 वाजता सुटेल आणि अकोला येथे त्याच दिवशी 23:30 वाजता पोहोचेल.
01132 विशेष गाडी 21 ऑक्टोंबर 2026 आणि 22 ऑक्टोंबर 2026 रोजी अकोला येथून 00:20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 04:50 वाजता पोहोचेल.
थांबे- अजनी, वर्धा ,पुलगाव, धामणगाव, बडनेरा आणि मूर्तिजापूर.
गाडीची संरचना- 1 वातानुकूलित द्वितीय, 3 वातानुकूलित तृतीय, 7 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय असनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
6) भुसावळ ते नागपूर विशेष अनारक्षित गाडी (4 फेरी)
01213 विशेष गाडी 21 ऑक्टोंबर 2026 आणि 22 ऑक्टोंबर 2026 रोजी भुसावळ येथून 05:00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12:20 वाजता नागपूर येथे पोहचेल.
01214 विशेष गाडी 20 ऑक्टोंबर 2026 आणि 21 ऑक्टोंबर 2026 रोजी नागपूर येथून 21:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04:00 वाजता भुसावळ येथे पोहचेल.
थांबे – मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी.
संरचना- 08 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह
7) सोलापूर ते नागपूर विशेष अनारक्षित गाडी (2 फेरी)
01029 विशेष गाडी 19 ऑक्टोंबर 2026 रोजी सोलापूर येथून 09:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05:10 वाजता नागपूर येथे पोहचेल.
01030 विशेष गाडी 20 ऑक्टोंबर 2026 रोजी नागपूर येथून 23:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23:45 वाजता सोलापूर येथे पोहचेल.
थांबे – कुर्डूवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी.
संरचना- 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह.









