होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शहरातील १२० शाळांचा सहभाग, विद्यार्थ्यानी साकारल्या शाडू मातीच्या ४० हजार गणेशमूर्तीं; एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

On: September 10, 2026 12:08 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) पर्यावरण विभागाच्या पुढाकारातून शहरातील १२० शाळांच्या सहभागाने शाडू मातीपासून ४० हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली. या उल्लेखनीय उपक्रमाची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. मनपा, विद्यार्थी आणि शाळा यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला.

४० हजार गणेशमूर्ती साकारल्या

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या नाशिकच्या प्रयत्नांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. यंदा महानगरपालिकेने सुरुवातीला २५ हजार गणेशमूर्तींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, शाळा, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने हे उद्दिष्ट ओलांडून तब्बल ४० हजार गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली. मागील वर्षी या उपक्रमांतर्गत १६ हजार गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या होत्या.

शाडू मातीचा वापर

या विक्रमी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या साहित्याऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाला शाळा आणि नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

या विशेष कार्यक्रमास मा. पालकमंत्री ना.गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, सभापती मच्छिंद्र सानप, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,प्रदीप चौधरी यांची उपस्थिती होती.

१२० शाळांचा सहभाग

या व्यापक पर्यावरणपूरक उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच महापौर कार्यालयातील स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

पर्यावरण विभागातील राहुल बोबे, मनोज धामणे, सावंत, अनुराग, काळे आणि कोमल मेंढे, तसेच दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांनी १२० शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधत समर्पित भावनेने काम केले.

पर्यावरणीय जनजागृती

हा उपक्रम केवळ जागतिक विक्रमापुरता मर्यादित नसून, विद्यार्थी, शिक्षक, शाळा, नागरिक आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे. या उपक्रमामुळे नाशिक शहर अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाबाबत जागरूक बनविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

या विक्रमी उपक्रमातून परंपरा आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समन्वय साधता येतो, असा प्रभावी संदेश देण्यात आला आहे. नागरिक, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास सकारात्मक पर्यावरणीय बदल घडवून आणता येतो, हे नाशिकने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समधील ही नोंद नाशिकच्या वाढत्या पर्यावरणीय जाणीवेची आणि नाशिक महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या समर्पित प्रयत्नांची साक्ष देणारी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment