होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मृत्यूच्या दाढेतून चिमुकल्याला खेचून आणले; डॉ. शरद बाविस्कर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

On: September 17, 2026 2:10 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: घराजवळ खेळता खेळता जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात पडलेल्या अवघ्या दोन वर्षीय शिव विश्वास भिक (रा. ढेकू) या चिमुकल्याला डॉ. शरद बाविस्कर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे नवजीवन मिळाले. गंभीर अवस्थेत असलेल्या शिववर अमळनेर येथील कस्तुरबा बालरुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले.

घटना अशी

शिव घराजवळ खेळत असताना अचानक पाण्याच्या हौदात पडला. काही वेळाने तो दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आईने परिसरात शोध घेतला असता तो हौदात आढळून आला. तिने तातडीने त्याला बाहेर काढले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला डॉ. अनिल शिंदे व डॉ. संदीप जोशी यांच्याकडे नेले. प्राथमिक जीवनावश्यक उपचार केल्यानंतर बालकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने महागडे उपचार करणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. शरद बाविस्कर यांनी शिवला कस्तुरबा बालरुग्णालयात दाखल करून घेतले. वैद्यकीय पथकासह त्यांनी तातडीने उपचार सुरू केले. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि उपचारानंतर शिवची प्रकृती सुधारत तो पूर्णपणे बरा झाला.

उपचारांचा खर्च घेतला नाही

शिवचे वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉ. बाविस्कर यांनी बालकावर मोफत उपचार केले. एवढेच नव्हे, तर बालकाच्या आनंदासाठी त्यांनी त्याला नवीन कपडेही भेट दिले.

डॉक्टरांनी आमच्या मुलाला नवजीवन दिले

“आमची परिस्थिती बिकट असताना त्यांनी मोफत उपचार केले आणि मुलासाठी नवीन कपडेही दिले. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही,” अशी भावना शिवच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. या घटनेतून वैद्यकीय सेवेसोबतच माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. चिमुकल्या शिवला संकटातून बाहेर काढण्यासाठी डॉ. शरद बाविस्कर व त्यांच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment